Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांसाठी नवे डिजिटल धोरण; कर्नाटकमध्ये स्क्रीन टाइमवर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या नवे डिजिटल नियम

सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. याचाच विचार करून कर्नाटक सरकारने आता नवीन नियम जारी केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 25, 2026 | 12:23 PM
विद्यार्थ्यांसाठी नवे डिजिटल धोरण; कर्नाटकमध्ये स्क्रीन टाइमवर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या नवे डिजिटल नियम

विद्यार्थ्यांसाठी नवे डिजिटल धोरण; कर्नाटकमध्ये स्क्रीन टाइमवर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या नवे डिजिटल नियम

Follow Us
Follow Us:
  • मोबाईलच्या अतिवापरावर नियंत्रणासाठी कर्नाटक सरकारचा पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी नवे नियम प्रस्तावित
  • 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? कर्नाटक सरकारचा मसुदा चर्चेत
  • स्क्रीन टाइम वाढल्याने सरकार सतर्क; विद्यार्थ्यांसाठी डिजिटल डिटॉक्स धोरण जाहीर
स्क्रीनचा अतिवापर आणि त्याचा तरुणांच्या मनावर होणारा परिणाम याबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वापरासंदर्भात धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर हा मसुदा समोर आला आहे. हा मसुदा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने कर्नाटक राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण (केएसएमएचए), शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय मानसिक आरोग्य व मेंदू विज्ञान संस्था (एनआयएमएचएएनएस) यांच्या सहकार्याने तयार केला आहे.

आता अनोळखी नंबर ओळखण्यासाठी Truecaller ची गरज नाही! BSNL घेऊन येतोय जबरजस्त फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

यात डिजिटल डिटॉक्सवर विशेष भर देण्यात आला आहे. ही पॉलिसी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारतातील अभ्यासांनुसार सुमारे २५% किशोरवयीन मुलांमध्ये इंटरनेटच्या व्यसनाची लक्षणे दिसून येतात. यामुळे चिंता वाढणे, झोपेचे विकार आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते, अनियंत्रित तंत्रज्ञान वापर हा शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य घसरणीचे मोठे कारण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर या धोरणाचा उद्देश डिजिटल वेलनेस, भावनिक संतुलन आणि स्क्रीन टाईमबाबत जागरूकता वाढवणे हा आहे. हे धोरण इयत्ता ९-१०, ११-१२ चे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अशा मोठ्या गटाला उद्देशून आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

डिजिटल वेलनेस समित्या स्थापन करण्यावर भर

या धोरणात डिजिटल जागरूकता वाढवणे, सहकारी सहाय्य प्रणाली विकसित करणे आणि समस्यात्मक वापर लवकर ओळखणे यावर भर देण्यात आला आहे. अंमलबजावणीसाठी शाळांना डिजिटल वेलनेस समित्या स्थापन करणे बंधनकारक असेल. या समित्या विद्यार्थ्यांमधील तंत्रज्ञानाच्या व्यसनाची प्रारंभिक लक्षणे ओळखून आवश्यकतेनुसार समुपदेशनाची मदत देतील.

मुलांना ऑनलाईन शोषण, सायबर फसवणूक याबाबत जागरूक केले जाईल. प्रत्येक शाळेला सायबरबुलिंग आणि डिजिटल गैरवर्तनावर नियंत्रणासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्वे तयार करावी लागतील. तसेच, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या डिजिटल वापरावर कसे नियंत्रण ठेवावे, हे देखील स्पष्ट केले जाईल. विशेष म्हणजे, शैक्षणिक कारणांव्यतिरिक्त मनोरंजनासाठी स्क्रीन टाईम दररोज एक तासापेक्षा जास्त नसावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

OnePlus चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! डिझाईन आणि फीचर्स आहेत टॉपक्लास… जाणून घ्या किंमत

शिक्षकांना विशेष प्रशिक्षण

या धोरणात शिक्षक आणि पालकांच्या भूमिकेला विशेष महत्त्व दिले आहे. शिक्षकांना डिजिटल साधनांचा अतिवापर ओळखणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. तर पालकांना नियमित दिनचर्या ठरवणे, स्क्रीन टाईम मर्यादित ठेवणे आणि मुलांना ऑफलाईन उपक्रमांकडे वळवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिली जातील. मुले आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील.

Web Title: Karnataka proposes new digital rules for students screen time limits under focus tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Social Media
  • social media ban
  • Tech News

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.