India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण
भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक अनोखे आणि नवीन गॅझेट्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर स्मार्टफोनची दुनिया देखील प्रचंड बदलली आहे. सध्याच्या काळात स्मार्टफोन केवळ बोलण्यासाठी वापरला जात नाही तर स्मार्टफोनद्वारे आपलं स्टेटस देखील ठरवलं जातं. स्मार्टफोनच्या डिझाईन आणि स्टाईलमध्ये ज्या प्रकारे बदल होत आहे, त्याचप्रमाणे स्मार्टफोनच्या किंमती देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच सर्वात महागडा स्मार्टफोन कोणता असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन Samsung Galaxy Z Fold 7 हा आहे. या स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिअंटची किंमत सुमारे 1,74,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन भारतातील प्रिमियम स्मार्टफोन्सपैकी एक आहे. केवळ स्मार्टफोनची किंमत नाही तर स्मार्टफोनचे फीचर्स देखील अत्यंक कमाल आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
Samsung ने अलीकडेच लाँच केलेल्या या Samsung Galaxy Z Fold 7 फोल्डेबल फोनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. Galaxy Z Fold 7 केवळ 4.2mm पातळ आणि 215 ग्रॅम हलका आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन अगदी सहज कुठेही घेऊन जाऊ शकता. स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये Armor Aluminum आणि Gorilla Glass Ceramic 2 ची सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये 8 इंच QXGA+ डायनामिक AMOLED 2X इनर डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, कमाल ब्राइटनेस अत्यंत चांगले कलर प्रोडक्शन आहेत. याशिवाय 6.5 इंच फुल-HD+ कवर डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, जो स्टाइलिश आणि प्रॅक्टिकल आहे.
Z Fold 7 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite for Galaxy प्रोसेसर आहे, सर्वात पावरफुल मानला जातो. यासोबतच फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 4,400mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W वायर्ड आणि Fast Wireless Charging 2.0 सपोर्ट आहे, या डिव्हाईसमध्ये IP48 रेटिंग, Bluetooth 5.4, Wi-Fi 7, 5G आणि LTE सारखे प्रीमियम कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. One UI 8 आधारित Android 16 सॉफ्टवेयर सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये क्रांतीकारी बदल करण्यात आले आहेत. Galaxy Z Fold 7 मध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा (OIS व Quad Pixel ऑटोफोकससह), 12MP अल्ट्रा वाइड आणि 10MP टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, कव्हर आणि आतील डिस्प्ले दोन्हीवर 10MP कॅमेरा आहे. प्रोव्हिज्युअल इंजिन सारखे स्मार्ट एआय फीचर्स फोटो आणि व्हिडिओ क्वालिटीला नवीन उंचीवर घेऊन जातात.
Z Fold 7 कोणत्या स्मार्टफोन्सना टक्कर देतो?
Vivo X Fold 5 आणि Google Pixel 9 Pro Fold
Vivo X Fold 5 ची किंमत किती आहे?
1,49,999 रुपये
Google Pixel 9 Pro Fold ची किंमत किती आहे?
1,29,999 रुपये