गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन कसं मॅनेज कराल? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत
Google Chat, Google Workspace या इकोसिस्टममधील सर्वात महत्त्वाची आणि युजर्समधील लोकप्रिय सेवा आहेत. बहुतेक युजर्स त्यांच्या अधिकृत कामासाठी Google Chat चा वापर करतात. आपल्या लॅपटॉपवर येणारे मॅसेज अनेक वेळा वाचायचे राहून जातात. हे मॅसेज तुमच्याकडून मिस होऊ नयेत त्यासाठी आता आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रीक सांगणार आहोत. ही ट्रीक म्हणजे गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन मॅनेज करणं. तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने आणि काही स्टेप्स फॉलो करून गुगल चॅटमध्ये नोटीफिकेशन मॅनेज करू शकता.
हेदेखील वाचा- Elista ने भारतात लाँच केला 85 इंचाचा Google TV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
गुगल त्याच्या चॅट प्लॅटफॉर्ममध्ये सतत सुधारणा करत आहे. ज्यामुळे युजर्सना गुगल चॅटचा वापर करताना चांगला अनुभव येईल. कंपनी गेल्या काही काळापासून Google Chat, Google Workspace च्या इकोसिस्टमचे मॅसेजिंग प्लॅटफॉर्म सतत अपग्रेड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करून कंपनी हा प्लॅटफॉर्मचे युजर्स वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हॉट्सॲपला टक्कर देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. (फोटो सौजन्य- pinterest)
तुम्ही ऑफिशियल कामासाठीही गुगल चॅट वापरत असाल तर, तुम्हाला नोटिफिकेशन न मिळाल्यास, तुमचे काही महत्त्वाचे संदेश मिस होतात, तर आता आम्ही तुम्हाला या मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या नोटिफिकेशन फीचरबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने गुगल चॅटमध्ये नोटिफिकेशन मॅनेज करू शकणार आहात.
हेदेखील वाचा- आता पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही! आधार क्रमांक करणार तुमची मदत
तुम्हाला Google Chat मध्ये विविध नोटिफिकेशन पर्याय मिळतात. तुम्हाला सर्व नोटिफिकेशन बंद करण्यासोबतच सर्व नोटिफिकेशन चालू करण्याचा पर्याय मिळेल. यासोबतच तुम्हाला Notify Always (सर्व मॅसेज), Notify Less (केवळ नमूद केलेल्या मेसेज आणि नवीन मॅसेजचे नोटिफिकेशन) या नोटिफिकेशन्स मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला फक्त टॅग केलेल्या संदेशांचे नोटिफिकेशन मिळेल.