आता पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही! आधार क्रमांक करणार तुमची मदत
सध्या डिजीटल जग सुरु आहे. त्यामुळे आपण बहुतेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो. पण काही दुकानदारांकडे किंवा छोट्या भाजीवाल्यांकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा नसते. तसेच इतर अनेक ठिकाणी आपल्याला रोख रकमेची गरज लागते. अशावेळी आपण एटीएममध्ये धाव घेतो. पण अशा परस्थितीत जर आपल्याकडे डेबिट कार्ड नसेल तर आपली मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. पैसे कसे काढायचे असा प्रश्न आपल्यासमोर असतो. आता पैसे काढण्यासाठी आपल्याला आपला आधार क्रमांक मदत करू शकतो.
हेदेखील वाचा- गुगल मॅपही देतोय प्रभू रामांच्या अयोध्येतील प्रवासाची साक्ष, पुराणातील हा दावा ठरतोय खरा
सध्या लोक व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. जरी आजकाल सर्वत्र ऑनलाइन पेमेंट केले जाऊ शकते, तरीही कधीकधी आपल्याला रोख रकमेची आवश्यकता असते. अनेकदा असे घडते की आपण ऑनलाइन पेमेंटवर अवलंबून राहून कुठेही जातो, परंतु काही ठिकाणे अशी आहेत की जिथे ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध नसते आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डही नसते. या परिस्थितीत आधार कार्ड तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आधार क्रमांकावरून रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. हे आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AePS) द्वारे करणे शक्य आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
AEPS म्हणजे ‘आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम’. AEPS आधार कार्डद्वारे ग्राहकांना अनेक बँकिंग संबंधित सेवा प्रदान करते. या सुविधेच्या मदतीने रोख पैसे काढणे, बॅलेंस इन्क्वायरी आणि फंड ट्रांसफर करणे शक्य आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे ग्राहकांना आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टममधून पैसे काढण्याची सुविधा प्रदान केली जाते.
हेदेखील वाचा- Apple iPad mini भारतात लाँच, सर्वात शक्तिशाली A17 Pro चिप आणि Apple Intelligence फीचर्सने सुसज्ज