BGMI 3.5 Update: Krafton ने केली बीजीएमआई अपडेटची घोषणा, नवीन फीचर्ससह मिळणार पावरफुल शस्त्रे
BGMI प्लेअर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांच्यासाठी एक नवीन अपडेट रोल आउट केलं जाणार आहे. कारण Krafton ने आता अधिकृतपणे Battlegrounds Mobile India (BGMI) 3.5 अपडेटची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर BGMI 3.5 अपडेट पॉडकास्टमध्ये BGMI च्या नवीन अपडेटबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे आता लवकरच BGMI प्लेअर्सना एक नवीन गेममध्ये एक नवीन अनुभव मिळणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
BGMI 3.5 अपडेट Icemire Frontier थीम आणि अनेक नवीन गेमप्लेसह रोल आऊट केलं जाणार आहे. या अपडटेनंतर BGMI प्लेअर्सना गेममध्ये नवीन चॅलेंज आणि फीचर्स देखील मिळणार आहेत. BGMI प्लेअर्स या नवीन अपडेटसाठी प्रचंड उत्सुक आहेत. ते अगदी आतुरतेने या नवीन अपडेटची वाट पाहत आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
BGMI प्लेअर्सना हे नवीन अपडेट कधी रोल आऊट होणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. BGMI 3.5 अपडेट 21 नोव्हेंबर रोजी रोल आऊट केलं जाणार आहे. कंपनीच्या मागील अपडेटबद्दल विचार केला तर, हे नवीन अपडेट सर्वात आधी अँड्रॉईड युजर्ससाठी रोल आऊट केलं जाऊ शकतं. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 ते 11.30 या वेळेत अँड्रॉईड युजर्ससाठी BGMI 3.5 अपडेट रोल आउट होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 08:30 वाजता iOS युजर्ससाठी BGMI 3.5 अपडेट रोल आउट केलं जाऊ शकते.
फ्रॉस्टीम: अपडेटसह, प्लेअर्स Chieftain’s Fortress आणि Beast-Taming Arena सारखे क्षेत्र एक्सप्लोर करण्यास सक्षम असतील. येथे प्लेअर्सना अधिक लूटचे पर्याय मिळतील. यासोबतच प्लेअर्सना Ice Crystal Crate च्या माध्यमातून रिवार्डसह बॅटल हॉटस्पॉटही मिळतील.
ग्लेशियर व्हिलेज: BGMI मधील प्लेअर्ससाठी हे मुख्य लँडिंग स्पॉट असू शकते, जेथे लूट आणि रिस्पॉन कार्ड उपलब्ध असतील.
फ्रॉस्टबोर्न ड्रॅगन: या नवीन चॅलेंजमध्ये, प्लेअर्स जमिनीवर आणि एरियल अटॅकदरम्यान ड्रॅगनसोबत एकमेकांशी सामना करतील. यासोबतच फ्रॉस्टबोर्न ड्रॅगनला पराभूत केल्यावर खेळाडूंना बक्षिसे आणि मौल्यवान वस्तू मिळतील.
मॅमथ: या वाहनात चार खेळाडू चढू शकतील. या चारपैकी तीन प्रवासी शूट करू शकतील. खेळाडू थोडावेळ थांबण्यासाठी पायांना टार्गेट करू शकतात. मात्र, काही वेळाने ते बरे होतात.
सेबरटूथ टायगर: हे टू-सीटर वाहन आहे, ज्यामध्ये खेळाडू सवारी करताना शूट करू शकतील. हे वाहन ड्रिफ्ट आणि डॅश कॉम्बो आणि डायनॅमिक हालचालीसह जंपिंग यांसारख्या वैशिष्ट्यांसह येते.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
BGMI 3.5 अपडेटमध्ये, खेळाडूंना नवीन बॅटल पास मिळतो, ज्यामध्ये खेळाडूंना अनेक उत्तम बक्षिसे आणि इन-गेम आयटम मिळतात.
BGMI च्या नवीन अपडेटसह, खेळाडूंना चांगले व्हिज्युअल आणि गेमप्ले मिळेल. यासोबतच युजर्सना विंटर वंडरलँडमध्ये रिफाइन मेकॅनिक्सचा एक इमर्सिव अनुभव मिळेल. या अपडेटसह, युजर्सना नवीन शस्त्रे आणि स्किन देखील मिळतील. गेमला Vipen Wield च्या समर्थनासह नवीन ग्लेशियर थीम स्किन मिळेल.