Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर…. Google Maps चे ‘हे’ सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Google Map Secret Features: गुगल मॅपचा वापर आपण प्रत्येत प्रवासात करतो. पण गुगलचे असे अनेक फायदे आहेत, ज्याबद्दल सुमारे 90 टक्के यूजर्सना माहिती नाही. अशाच काही फायद्यांबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2026 | 07:41 PM
फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर.... Google Maps चे 'हे' सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर.... Google Maps चे 'हे' सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Follow Us
Close
Follow Us:
  • नेव्हिगेशनपलीकडेही फायद्याचा आहे गुगल मॅप
  • Google Maps वर करता येतात हे काम
  • गुगल मॅपच्या या 7 भन्नाट गोष्टी माहित नसतील
जगभरातील सुमारे 2 बिलियन म्हणजेच 200 करोडहून अधिक लोकं नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म गुगल मॅपचा वापर करता. प्रवासाला जाताना रस्ता पाहण्यासाठी गुगल मॅप फायद्याचा ठरतो, याबाबत तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण गुगल मॅपचा केवळ इतकाच उपयोग आहे का? गुगल मॅप केवळ रस्ता दाखवण्यासाठीच नाही तर इतर अनेक कामांसाठी देखील फायदेशीर ठरतो. गुगल मॅपचे अनेक फायदे आहेत. गुगल मॅप तुम्हाला अशा विषयावर देखील माहिती देऊ शकतो, ज्याबाबत तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. चला तर मग फ्री फायर मॅक्सच्या सर्व फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

चार्जिंग/फ्यूल स्टेशन

गुगल मॅप्सच्या मदतीने तुम्ही रस्त्यात असणाऱ्या चार्जिंग किंवा फ्यूल स्टेशनची माहिती मिळवू शकणार आहात. गुगल मॅप तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्यांसाठी उपलब्ध असलेल्या चार्जिंग स्टेशनची माहिती देतो. जेव्हा तुम्ही गुगल मॅपमध्ये तुमचे डेस्टिनेशन निवडता, त्याचवेळी तुम्हाला रस्त्यात असणाऱ्या चार्जिंग आणि फ्यूल स्टेशनची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला रस्त्यात गाडीमध्ये फ्युएल टाकण्याची चिंता राहणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्टोअरमध्ये कोणते प्रॉडक्ट उपलब्ध?

गूगल मॅपमध्ये असे देखील एक फीचर देण्यात आले आहे, जे तुम्हाला नकाशात दिसणाऱ्या स्टोअरमध्ये कोणते प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, याची माहिती देणार आहेत. उदाहरणार्थ जर तुम्हाला रस्त्यात एखाद्या ब्रँडचे स्टोअर दिसले तर गुगल मॅपमध्ये लोकेशन झूम करून तुम्ही त्या स्टोअरमध्ये कोणत्या वस्तू मिळतात, याची माहिती देखील मिळवू शकणार आहात.

एरिया मेजरमेंट

गुगल मॅपमध्ये तुम्ही एखाद्या खास ठिकाणाचे मोजाप देखील घेऊ शकणार आहात. यासाठी नाकाशावर राईट क्लिक करा आणि दोन कोणतेही पॉईंट निवडा आणि तुम्ही त्या ठिकाणाचे मोजमाप घेऊ शकणार आहात. तुम्ही माऊस पॉइंटर वापरून क्षेत्रफळ मोजू शकता.

बिजनेसची माहिती

गुगल मॅप्समध्ये तुम्हाला असं देखील एक फीचर मिळणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही परिसरात शिकणाऱ्या व्यवसायांबद्दल माहिती मिळू शकते. यासाठी तुम्हाला गुगल मॅप्सवर ब्लू ब्रिफकेस ओपन करावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला त्या व्यवसायाचे एक्सेसिबिलिटी ऑप्शन, आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉल, पेमेंट पद्धती आणि ग्राहक सहाय्य पातळी इत्यादींबद्दल माहिती मिळेल.

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

एक्सेसिबल प्लेस

गुगल मॅप्समध्ये तुम्ही कोणत्याही लोकेशनच्या एक्सेसिबल ठिकाणाची माहिती मिळवू शकणार आहात. यासाठी तुम्हाला गुगल मॅपच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. यानंतर एक्सेसिबिलिटीवर टॅप करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही एक्सेसिबिलिटी लोकेशनवर टॅप करून फीचर इनेबल करू शकणार आहात.

रियल-टाइम ट्रॅफिक अपडेट

गुगल मॅप्समध्ये रियल-टाइम ट्रॅफिक अपडेट देखील मिळणार आहे. यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात, त्या ठिकाणाचे नेविगेशन ऑन करावे लागणार आहे आणि ड्राइववाल्या ऑप्शनमध्ये जाऊन रियल-टाइम ट्रॅफिक माहिती मिळवू शकणार आहात.

एआई फीचर्स

गुगलने अलीकडेच त्यांच्या सर्व सर्विससाठी एआई फीचर्स इंटिग्रेट करण्यास सुरुवात केली आहे. आता, तुम्हाला गुगल मॅप्समध्ये एआय शिफारशी देखील मिळतील. उदाहरणार्थ, जर पाऊस पडत असेल, तर तुम्हाला गुगल मॅप्समध्ये अल्टर्नेटिव एक्टिविटीसाठी सूचना मिळतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Maps फक्त रस्ता दाखवतो का?

    Ans: नाही, हे अ‍ॅप ट्रॅफिक अपडेट, ठिकाणांची माहिती, रिव्ह्यू, फोटो आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट तपशीलही देते.

  • Que: Google Maps ऑफलाइन वापरता येतो का?

    Ans: होय, आधी नकाशा डाउनलोड केल्यास इंटरनेटशिवायही वापरता येतो.

  • Que: Google Maps वर रस्ता बदलण्याचा सल्ला मिळतो का?

    Ans: हो, ट्रॅफिक जास्त असल्यास अ‍ॅप पर्यायी मार्ग सुचवते.

Web Title: This are the secret features of google map 90 percent users dont know about this tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • Google Mapping
  • Google maps
  • Tech News

संबंधित बातम्या

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट
1

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
2

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
3

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.