Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

POCO C85 5G : स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

सर्वोत्तम बॅटरी अनुभवासाठी पोको सी८५ ५जी मध्‍ये ६००० एमएएच बॅटरी आहे, जी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते. ३३ वॅट फास्‍ट चार्जिंगसह स्‍मार्टफोन फक्‍त २८ मिनिटांमध्‍ये ५० टक्‍के चार्ज होऊ शकतो.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 16, 2025 | 07:06 PM
स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

स्टायलिश लूक आणि बरंच काही, पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

Follow Us
Close
Follow Us:
  • पोको हा भारतातील आघाडीचा ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड
  • भारतातील तरूणांसाठी डिझाइन करण्‍यात आला
  • ६००० एमएएच बॅटरी आहे
मुंबई : पोको या भारतातील सर्वात विश्वसनीय ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने फक्‍त फ्लिपकार्टवर नवीन पोको सी८५ ५जी च्‍या फर्स्‍ट सेलला सुरूवात केली आहे. सर्वोत्तम बॅटरी अनुभवासाठी पोको सी८५ ५जी मध्‍ये ६००० एमएएच बॅटरी आहे, जी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते. ३३ वॅट फास्‍ट चार्जिंगसह स्‍मार्टफोन फक्‍त २८ मिनिटांमध्‍ये ५० टक्‍के चार्ज होऊ शकतो, ज्‍यामधून तुम्‍ही सतत कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईसला पोर्टेबल पॉवर बँक बनवते, ज्‍यासह मोबाइल्‍स, टीडब्‍ल्‍यूएस इअरबड्स, स्‍मार्टवॉचेस् आणि इतर अॅक्‍सेसरीज चार्ज करता येऊ शकतात. हा पॉवर-पॅक स्‍मार्टफोन १२,००० रूपयांपेक्षा कमी किमतीच्‍या डिवाईसेसमध्ये उपलब्ध आहे.

पोको सी८५ ५जी या स्‍मार्टफोनमध्‍ये स्‍लीक, आधुनिक डिझाइनसह क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशिंग आहे. हा स्‍मार्टफोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्‍लॅक या रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. उच्‍च कार्यक्षम मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० चिपसेटची शक्‍ती असलेला हा डिवाईस गेमिंगपासून मल्‍टीटास्किंगपर्यंत प्रत्‍येक गोष्‍टीसाठी अत्‍यंत सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. तसेच, ५० मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा सेटअप महत्त्वपूर्ण क्षण सुस्‍पष्‍टपणे कॅप्‍चर होण्‍याची खात्री देते. फर्स्‍ट सेलला फ्लिपकार्टवर १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सुरूवात होत आहे.

बजेट सेगमेंटमध्ये डबल धमाका! Realme च्या दोन स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत 13,999 रुपयांपासून सुरु

अद्वितीय लाँच किमतीसह १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर पोको सी८५ च्‍या विक्रीला सुरूवात होईल. सुरूवातीची किंमत ४ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १०,९९९ रूपये*, ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरएिण्‍टसाठी ११,९९९ रूपये* आणि ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३,४९९ रूपये* आहे. लाँच ऑफरचा भाग म्‍हणून ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्सचा वापर करत १,००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटचा आनंद घेऊ शकतात किंवा पात्र डिवाईसेसवर १,००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बोनसचा अवलंब करू शकतात. तसेच, क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर ३ महिने नो-कॉस्‍ट ईएमआय उपलब्‍ध आहे. वरील ऑफर्स फक्‍त विक्रीच्‍या पहिल्‍या दिवशी लागू आहेत.

पोको सी८५ ५जी हा असा स्मार्टफोन आहे जो उत्कृष्ट बॅटरी लाइफ, आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स यांचा परिपूर्ण संगम साधतो. यामध्ये ६००० एमएएच क्षमतेची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली असून ती एका चार्जवर दोन दिवसांहून अधिक काळ सहज वापर करता येईल इतकी सक्षम आहे. यासोबतच ३३ वॅट फास्ट चार्जिंग आणि अत्यंत उपयुक्त १० वॅट वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. डिझाइनच्या बाबतीत, प्रीमियम फील देणारा क्वॉड-कर्व्ह्ड बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी, ड्युअल-टोन फिनिश आणि वेगळा उठून दिसणारा कॅमेरा डेको यामुळे हा फोन सेगमेंटमध्ये खास ठरतो आणि हातात घेतल्यावर उत्तम ग्रिप देतो.

सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच डिस्प्लेवर १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला असून त्यामुळे स्क्रॉलिंग, स्वाइपिंग, गेमिंग आणि मनोरंजनाचा अनुभव अत्यंत स्मूथ व आनंददायी होतो. मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा डिव्हाइस ४.५ लाखांहून अधिक AnTuTu स्कोअर मिळवून उत्कृष्ट कार्यक्षमता प्रदान करतो. पोको सी८५ ५जी अँड्रॉईड १५ वर आधारित हायपरओएस २.२ सह आउट ऑफ द बॉक्स उपलब्ध असून, सेगमेंटमधील सर्वोत्तम सॉफ्टवेअर कटिबद्धतेअंतर्गत २ अँड्रॉईड अपग्रेड्स आणि ४ वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्यात येतात. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत हा स्मार्टफोन अधिक शक्तिशाली बॅटरी, मोठा व आकर्षक डिस्प्ले आणि प्रीमियम क्वॉड-कर्व्ह्ड बॅक डिझाइनसह मोठी झेप घेतो, तसेच हातात सहज बसणारा आहे. ट्रेंडी पण कार्यक्षम डिव्हाइस शोधणाऱ्या तरुण आणि उत्साही वापरकर्त्यांसाठी खास डिझाइन करण्यात आलेला पोको सी८५ ५जी सध्या फक्त फ्लिपकार्टवर पहिल्या सेलच्या खास ऑफर्ससह उपलब्ध आहे—म्हणून ही संधी हातातून जाऊ देऊ नका.

Lenovo Idea Tab Plus: 10000mAh बॅटरी आणि तगडा प्रोसेसर…. नव्या टॅब्लेटने भारतात घातलाय धुमाकूळ, फीचर्स जाणून घ्या

Web Title: Launch of the first sale of poco c85 5g

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 07:06 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर
1

OnePlus 15R होणार महाग? भारतात डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा कंपनीने दिला इशारा, खरेदीपूर्वी वाचा सविस्तर

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे
2

Airtel Recharge Plan: 300GB डेटा आणि तब्बल 84 दिवसांची व्हॅलिडिटी… कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा…
3

यूजर्सना लागली लॉटरी! YouTube च्या प्रिमियम लाईट प्लॅनमध्ये मोठा बदल, केवळ 89 रुपयांत मिळणार ‘या’ सुविधा…

भारत सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ 5 ओटीटी अ‍ॅप्सवर घातली बंदी, अश्लील कंटेंट दाखवल्याने केली कारवाई
4

भारत सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ 5 ओटीटी अ‍ॅप्सवर घातली बंदी, अश्लील कंटेंट दाखवल्याने केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.