5,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा... जबरदस्त फीचर्ससह Lava ने लाँच केला सुपर स्मार्टफोन, इतकी आहे किंमत
इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये आता आणखी एका धमाकेदार बजेट स्मार्टफोनची एंट्री झाली आहे. टेक कंपनी लावाने त्यांचा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन लावा ब्लेज एमोलेड 2 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.
लावा ब्लेज एमोलेड 2 5G स्मार्टफोन मीडियाटेक 7060 चिपसेटने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. लावाच्या या नवीन डिव्हाईसमध्ये 6.67-इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. एवढचं नाही तर या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम देण्यात आली आहे. बॅटरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर इतर स्मार्टफोनच्या तुलनेत लावा ब्लेज एमोलेड 2 5G ची बॅटरी तितकी पावरफुल नाही. पण ज्यांना कमी किंमतीत जास्त फीचर्स असलेला स्मार्टफोन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन बेस्ट ऑप्शन आहे. (फोटो सौजन्य – X)
लावा ब्लेज एमोलेड 2 5G स्मार्टफोनच्या किंंमतीबद्दल बोलायचं झालं तर हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये फेदर व्हाइट आणि मिडनाइट ब्लॅक यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 16 ऑगस्टपासून ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर सुरु होणार आहे.
Blaze AMOLED 2 5G – Price: ₹13,499
Available at your nearest retail store
Sale starts on Amazon – 16th Aug✅ 16.94cm (6.67”) FHD+ AMOLED Display
✅Slimmest in the Segment*– 7.55mm body with Linea Design
✅ 50MP AI Camera with Sony Sensor
*Source:Techarc (Smartphones under 15K) pic.twitter.com/MTiPREvpWI— Lava Mobiles (@LavaMobile) August 11, 2025
लावाचा नवीन स्मार्टफोन अँड्रॉयड 15 वर चालतो आणि लवकरच या स्मार्टफोनला अँड्रॉइड 16 अपडेट देखील दिले जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह फ्रंटला होल-पंच कॅमेरा कटआउट देण्यात आला आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचचा फुल-एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 7060 चिपसेट आणि 6GB LPDDR5 रॅम देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी लावाच्या या नवीन डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Lava Blaze AMOLED 2 5G ची किंमत किती आहे?
13,499 रुपये
Lava Blaze AMOLED 2 5G ची विक्री कधीपासून सुरु होणार आहे?
16 ऑगस्ट
Lava Blaze AMOLED 2 5G मधील फ्रंट कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे?
8-मेगापिक्सल