Diamonds, Emote आणि Pets मिळणार फ्रीमध्ये! Free Fire MAX प्लेअर्ससाठी जारी करण्यात आले आजचे रिडीम कोड्स, आताच करा Claim
फ्री फायर मॅक्स डेवलपर कंपनी गेमला अधिक मजेदार बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. कंपनी नेहमीच या गेममध्ये काहीतरी नवीन घेऊन येत असते. कंपनी गेममध्ये अनेक ईव्हेंट देखील घेऊन येत असते. ज्यामुळे प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. फ्री फायरमध्ये रिलीज केले जाणारे सर्व ईव्हेंट्स युजर्सचं लक्ष वेधून घेतात. या रिवॉर्ड्समध्ये वेपन्स, पेट्स, कॅरेक्टर बंडल, लूट क्रेट, डायमंड्स यांचा समावेश असतो.
गेममध्ये मोफत रिवॉर्ड देणारे हे ईव्हेंट अधूनमधून रिलीज केले जात असले तरी, रिडीम कोड दररोज लाइव्ह असतात. प्लेयर्सना रिडीम कोडद्वारे मोफत रिवॉर्ड मिळवण्याची संधी देखील मिळते. गेममध्ये लाईव्ह होणाऱ्या ईव्हेंट्समध्ये फ्री रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना थोडी मेहनत करावी लागते. याशिवाय तुम्हाला हे रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी इन-गेम करेंसी Diamonds देखील खर्च करावे लागतात. डायमंड मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. पण तुम्ही डायमंड आणि पैसे खर्च न करता देखील वेपन्स, पेट्स, कॅरेक्टर बंडल, लूट क्रेट, सारखे रिवॉर्ड्स मिळवू शकता. यासाठी तुम्हाला गरेनाने जारी केलेल्या रिडीम कोड्सचा वापर करावा लागणार आहे. तुम्हाला फक्त कंपनीच्या रिडेम्पशन साइटला भेट देऊन कोड रिडीम करायचा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire Max खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आज गेममध्ये Festival Celebration Emote जिंकण्याची संधी आहे. प्लेअर्स आज अर्ध्या किंमतीत हे रिवॉर्ड जिंकू शकतात. याशिवाय, तुम्ही आज या गेममध्ये व्हॉट अ हार्टथ्रॉब बंडल आणि इटरनल डायमंड टॉप देखील अर्ध्या डायमंड्समध्ये खरेदी करू शकता. फ्री फायर मॅक्स गेममध्ये कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आणि इव्हेंटद्वारे गेममध्ये मोफत वस्तू मिळविण्यासाठी डायमंड्स आवश्यक आहेत. Free Fire Max Daily Special हे गेममधील एक स्पेशल सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये तुम्हाला गेममधील रेयर आइटम्स मिळवण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे केवळ दुर्मिळ वस्तूच नाही तर तुम्ही या स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंवर अर्ध्या दराने दावा करू शकता. खरं तर, या स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंवर 50 टक्के सूट उपलब्ध आहे.
1.Eternal Diamond Top ची किंमत 899 डायमंड्स आहेत, पण आज Daily Special स्टोरमध्ये 449 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.
2. Festival Celebration Emote ची किंमत 599 डायमंड्स आहेत, पण आज Daily Special स्टोरमध्ये 299 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.
3. BP S10 Token ची किंमत 10 डायमंड्स आहेत, पण आज Daily Special स्टोरमध्ये 5 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.
4. What a Heartthrob Bundle ची किंमत 1199 डायमंड्स आहेत, पण आज 599 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.
5. Iron ची किंमत 99 डायमंड्स आहेत, पण आज 49 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.