Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम, महिलेला घातला लाखोंचा गंडा

Work from Home Scam: सध्या स्कॅमच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक घटना चंदीगडमध्ये देखील घडली आहे. या ठिकाणी स्कॅमर्सनी महिलेला वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 01, 2025 | 09:36 AM
Instagram रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम, महिलेला घातला लाखोंचा गंडा

Instagram रिल्स लाईक करा आणि कमवा हजारो रुपये; सुरु झाला नवा स्कॅम, महिलेला घातला लाखोंचा गंडा

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या डिजिटल युगात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे आपली काम अगदी सोपी होत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती केली जात असून नवीन शोध लावले जात आहेत. त्यामुळे ज्या कामांना पूर्वी बराच वेळ लागत होता. तीच काम आता चुटरीसरशी होत आहेत. डिजिटल क्षेत्रातील प्रगतीसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. ऑनलाईन पैसे कमवण्याच्या नादात लोकं स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकत आहेत आणि स्वत:चं नुकसान करून घेत आहेत. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे, जिथे वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

iOS 19 अपडेट युजर्ससाठी घेऊन येणार सरप्राईज, बदलणार iPhone चा लूक! काय असणार खास, जाणून घ्या

महिलेला घातला लाखोंचा गंडा

चंदीगडमधील एका 27 वर्षीय महिलेची वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली फसवणूक झाली. यावेळी स्कॅमर्सनी या महिलेला 5.69 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. स्कॅमर्सनी महिलेला सांगितलं होतं की, इंस्टाग्राम व्हिडीओ लाईक करण्यासाठी त्या महिलेला पैसे दिले जातील. संबंधित महिला स्कॅमर्सच्या या बोलण्याला बळी पडली आणि या घटनेत तिचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही फसवणूक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सुरू झाली. नेमकं हे प्रकरण काय आहे, कशा प्रकारे महिलेची फसवणूक करण्यात आली, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

नेमकं काय आहे प्रकरण

संबंधित महिलेला तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला. ज्या व्यक्तिने मेसेज पाठवला तिने स्वतःची ओळख ‘स्नेहा वर्मा’ अशी करून दिली. तिने सांगितले की ती एका कंपनीशी संबंधित आहे जी घरून काम करून पैसे कमविण्याची संधी देते. त्या महिलेला सांगण्यात आले की ती फक्त इंस्टाग्राम व्हिडिओ लाईक करून दररोज 4,000 ते 8,000 रुपये कमवू शकते. महिलेला ही कामाची ऑफर आकर्षक वाटली आणि पैसे कमविण्याची चांगली संधी वाटली. म्हणून संबंधित महिलेने स्कॅमर्सची ही कामाची ऑफर स्विकारली.

यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला एक व्हिडिओ लिंक पाठवली आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगितले. सुरुवातीला, महिलेने काही कामे पूर्ण केल्यानंतर, तिच्या अकाऊंटमध्ये बनावट कमाई दाखवण्यात आली. यामुळे महिलेचा आत्मविश्वास वाढला आणि तिने हे काम करण्यासाठी अजून इंटरेस्ट दाखवला. मग, स्कॅमर्सनी महिलेला सांगितलं की जर तिने गुंतवणूक केली तर तिला जास्त नफा मिळेल.

Ghibli मुळे तुमची ओळख चोरली जातेय का? अब्जावधी डॉलर्समध्ये बाजारात विकला जातोय तुमचा चेहरा? काय होणार याचे परिणाम?

महिलेने लाखो रुपये कसे गमावले?

महिलेने प्रथम वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये दीड लाख रुपये ट्रान्सफर केले. नंतर, फसवणूक करणाऱ्यांनी तिला अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. अशाप्रकारे, महिलेने हळूहळू स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये 5.69 लाख रुपये ट्रान्सफर केले. फसवणूक करणाऱ्यांनी तिचा नफा बनावट अ‍ॅपवर दाखवला जेणेकरून तिला वाटेल की ती चांगले पैसे कमवत आहे. जेव्हा महिलेने तिची “कमाई” काढून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी तिला सांगितले की तिचा “स्कोअर” 100 गुणांपर्यंत पोहोचला पाहिजे, ज्यासाठी तिला आणखी 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. हे ऐकून त्या महिलेला संशय आला आणि तिने तिच्या कुटुंबियांना याबद्दल सांगितले. यानंतर महिलेला समजलं की ती फसवणूकीला बळी पडली आहे. यानंतर महिलेने चंदीगडमधील सायबर क्राईम पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्या खबरदारी

  • अनोळखी नंबरवरून येणाऱ्या सहज कमाईच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका. जर एखादी योजना खूप आकर्षक वाटत असेल, तर प्रथम तिची सत्यता तपासा.
  • तुमच्या बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा पासवर्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.
  • जर तुम्हाला नोकरीची ऑफर मिळाली तर प्रथम इंटरनेटवर त्याबद्दलच्या पुनरावलोकने आणि तक्रारी शोधा.
  • फक्त विश्वसनीय वेबसाइट्स आणि जॉब पोर्टल्सवरूनच नोकऱ्यांसाठी अर्ज करा. व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिग्रामवर येणाऱ्या ऑफर्स टाळा.

Web Title: Like instagram reels and earn money scam of work from home woman lost 5 lakhs rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • instagram
  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

Google चा सर्वात मोठा इशारा! पब्लिक Wi-Fi वापरताना सावधान, अन्यथा मोठे नुकसान होईल
1

Google चा सर्वात मोठा इशारा! पब्लिक Wi-Fi वापरताना सावधान, अन्यथा मोठे नुकसान होईल

Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat
2

Delhi Bomb Blast: दहशतवादी करत होते धोकादायक सेशन App चा वापर, फोन नंबर आणि E-mail शिवाय करत होते Chat

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार
3

Samsung Galaxy S26 सिरीजच्या सर्व मॉडेल्सवर मिळणार 12GB Ram, स्टोरेजची क्षमताही वाढणार

Airtel vs Jio vs BSNL: कोणत्या कंपनीकडे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लॅन?
4

Airtel vs Jio vs BSNL: कोणत्या कंपनीकडे सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम ब्रॉडबँड प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.