Linda ने सोडली Elon Musk ची साथ, X च्या CEO पदाचा दिला राजीनामा! सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट, म्हणाली...
एलन मस्कच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या X च्या सिईओ लिंडा याकारिनो यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सुमारे 2 वर्षांपूर्वी लिंडा याकारिनो यांनी X च्या सिईओ पदाची धुरा हाती घेतली होती. मात्र अवघ्या 2 वर्षांच्या कार्यकाळातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. लिंडा याकारिनो यांनी X वर याबाबात एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, त्यांचा X मधील 2 वर्षांचा अनुभव अद्भुत आणि मजेदार होता.
राजीनामा देताना लिंडा याकारिनो म्हणाली की, गेल्या काही वर्षांत X च्या टीमने जे मोठे बदल केले आहेत आणि जे यश गाठले आहे, त्यासाठी त्यांना टीमवर गर्व आहे. याकारिनोने यांनी केवळ युजर्सच्या प्रायव्हसीला प्राधान्य दिलं नाही तर एलन मस्कच्या X ला ‘एवरीथिंग अॅप’ बनवण्यात देखील महत्त्वाची भुमिका बजवाली आहे. मात्र आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता X चा नवीन सिईओ कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
After two incredible years, I’ve decided to step down as CEO of 𝕏.
When @elonmusk and I first spoke of his vision for X, I knew it would be the opportunity of a lifetime to carry out the extraordinary mission of this company. I’m immensely grateful to him for entrusting me…
— Linda Yaccarino (@lindayaX) July 9, 2025
जाहिरात व्यवसायाला पुन्हा करण्याचा प्रयत्न करूनही, कंपनीला बऱ्याच काळापासून अपेक्षित असलेली गती मिळू शकलेली नाही. अहवालांनुसार, मस्कच्या ट्विटर अधिग्रहणापूर्वीच्या तुलनेत X चा जाहिरात महसूल अजूनही सुमारे 50% आहे. मात्र गेल्या काही महिन्यात X मध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे की, कंपनीच्या जाहिरातींच्या उत्पन्नात सुधारणा होऊ शक. 2023 मध्ये, मस्कने काही चुकीच्या कमेंट्स केल्या. ज्यामुळे अनेक मोठ्या ब्रँड्सनी X पासून स्वतःला दूर केले. यामुळेच याकारिनोला ब्रँड्सचा विश्वास जिंकणे आणखी कठीण झाले.
दोन अविश्वसनीय वर्षांनंतर, मी X चे सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा एलोन मस्क आणि मी पहिल्यांदाच X साठीच्या त्याच्या दृष्टिकोनाबद्दल बोललो, मला माहित होते की या कंपनीचे असाधारण ध्येय पूर्ण करण्याची ही आयुष्यभराची संधी असेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची आणि X ला एव्हरीथिंग अॅपमध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. मला X टीमचा अविश्वसनीय अभिमान आहे. आम्ही आमच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आणि जाहिरातदारांचा आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यासाठी आवश्यक असलेल्या कामापासून सुरुवात केली.
याकारिनो यांच्या राजीनाम्याची बातमी सर्वत्र शेअर होताच मिस्टरबीस्टने एक अशी कमेंट केली ज्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहे. X वर शेअर करण्यात आलेल्या याकारिनो यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर मिस्टरबीस्टने कमेंट केली आहे. तो म्हणाला की, मी ही जबाबदारी स्विकारण्यास तयार आहे. त्यामुळे आता खरंच मिस्टरबीस्टला X ला सिईओ पदाची जबाबदारी दिली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
JUST IN: Linda Yaccarino steps down as CEO of X. pic.twitter.com/1GKWRxtAyC
— Watcher.Guru (@WatcherGuru) July 9, 2025