पावरफुल प्रोसेसर आणि जबरदस्त परफॉर्मंस... अशी झाली Galaxy Z Flip 7 FE ची धमाकेदार एंट्री, स्मार्टफोनचे फीचर्स वाचून व्हाल हैराण
Samsung चा 2025 मधील सर्वात मोठा टेक ईव्हेंट Samsung Unpacked 2025 चे 9 जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. या एकदिवसीय ईव्हेंटमध्ये कंपनीने जगासमोर अनेक नवीन गॅझेट्स सादर केले आहेत. या गॅझेट्सध्ये कंपनीच्या बहुप्रतिक्षित फ्लिप आणि फोल्ड फोन्सचा देखील समावेश आहे. Samsung Unpacked 2025 मध्ये कंपनीने फोल्ड 7 आणि फ्लिप 7 सह एक स्वस्त डिव्हाईस देखील लाँच केले आहे. हे स्वस्त डिव्हाईस म्हणजेच गॅलेक्सी Z Flip 7 FE.
कंपनीने गॅलेक्सी Z Flip 7 FE खास अशा लोकांसाठी लाँच केले आहे, ज्यांना फ्लिप फोन तर खरेदी करायचा आहे, पण त्यांचं बजेट कमी आहे. म्हणजेच आता युजर्सना त्यांच्या बजेटमध्ये फ्लिप फोन खरेदी करता येणार आहे. कंपनीच्या या स्वस्त गॅलेक्सी Z Flip 7 FE डिव्हाईसमध्ये Exynos 2400 चिपसेट देण्यात आला आहे. याशिवाय डिव्हाईसचा परफॉर्मंस कमाल आहे. एवढंच नाही तर या नव्या स्वस्त डिव्हाईसमध्ये 3.4-इंचाची सुपर AMOLED कवर स्क्रीन आणि डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चला तर मग आता कंपनीने लाँच केलेल्या या स्वस्त डिव्हाईसची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
आयोजित ईव्हेंटमध्ये कंपनीने Galaxy Z Flip 7, Samsung galaxy z fold 7 आणि गॅलेक्सी Z Flip 7 FE असे तीन डिव्हाईस लाँच केले. सर्वात पातळ Samsung Galaxy Z Fold 7 ची सुरुवातीची किंमत 174,999 रुपये आणि Samsung Galaxy Z Flip 7 ची किंमत भारतात 109,999 रुपये आहे. तर गॅलेक्सी Z Flip 7 FE ची सुरुवातीची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Galaxy Z Flip 7 FE मध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे स्मार्टफोन युजर्सना एक चांगला अनुभव मिळतो. Galaxy Z Flip 7 FE च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर गॅलेक्सी Z फ्लिप 7 प्रमाणेच FE एडिशनमध्ये देखील अँड्रॉइड 16 वर बेस्ड वन UI 8 देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 6.7-इंचाचा डायनामिक AMOLED 2X प्रायमरी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये रिफ्रेश रेट आणि 2,600 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर केली जाते. यासोबतच या फोनमध्ये 3.4-इंचाचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे.
सॅमसंगने लाँच केलेल्या या स्वस्त फोनमध्ये Galaxy AI फीचर्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये जेमिनी लाईव्ह, नाउ ब्रीफ, नाउ बार, AI सेलेक्ट, नेचुरल लँग्वेज सर्च, राइटिंग असिस्ट, सर्कल-टू-सर्च, नोट असिस्ट, ब्राउजिंग असिस्ट आणि ट्रांसक्रिप्ट असिस्टसह अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत.
नव्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये तुम्हाला 2x ऑप्टिकल झूमवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा पाहायला मिळतो. सेल्फी लवर्ससाठी डिव्हाईसमध्ये आतल्या बाजूला स्क्रीनवर 10-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
या डिव्हाईसमध्ये 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.