Online Gaming बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! लवकरच बंदी घालण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा
भारतात ऑनलाईन गेमिंगची क्रेझ काही नवीन नाही. लहान मुलांपासून तरूणांपर्यंत अगदी सर्वांमध्ये ऑनलाईन गेमिंगची क्रेझ आहे. भारतातील अनेक युट्यूबर्स व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर ऑनलाईन गेमिंगची लाईव्ह स्ट्रिम करून पैसे कमावतात. एवढंच नाही तर भारतातील गेमर्स टूर्नामेंट आणि मॅचद्वारे देखील कमाई करतात. पण आता या सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. त्यामुळे अशी शक्यता आहे की, लवकरच महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंगवर बंदी घातली जाऊ शकते.
महाराष्ट्रात तरूणांमध्ये ऑनलाईन गेमिंगची चांगलीच क्रेझ आहे. तरूणांमध्ये ऑनलाईन गेमिंग खूप लोकप्रिय आहे. पण यामुळे मोठं नुकसानं देखील होत आहे. आजची तरूण पिढी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेली आहे. यामुळे गुन्ह्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरुणांचे व्यसन, वाढती गुन्हेगारी आणि विशेषतः रिअल-मनी जुगार याच सर्वांचा विचार करून आता महाराष्ट्रात ऑनलाईन गेमिंगवर बंदी घातली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. प्रामुख्याने बेटिंग, जुगार आणि रिअल-मनी व्यवहारांशी संबंधित प्लॅटफॉर्मवर प्रथम बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
परवडणारे स्मार्टफोन, व्यापक इंटरनेट आणि मार्केटिंगमुळे २०२५ मध्ये ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय युजर्ससाठी ऑनलाइन गेमिंग फक्त एका क्लिकच्या अंतरावर आहे. तरूणांमध्ये ऑनलाईन गेमिंगचं व्यसन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या गेममध्ये विशेषत: बेटिंग, जुगार आणि रिअल-मनी व्यवहारांशी संबंधित प्लॅटफॉर्मचा संबंध आहे. ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दिले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात तरूणवर्ग या गेमकडे आकर्षित होतो. मात्र आता याच सर्व प्रकरणावर कठोर भुमिका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतला आहे. महाराष्ट्राचा सायबर विभाग आता शाळांमध्ये आणि सोशल मीडियावर राज्यव्यापी मोहिमा राबवत आहे, जेणेकरून तरुण वर्ग आणि पालकांना सुरक्षित गेमिंग पद्धतींबद्दल शिक्षित करता येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की, ऑनलाइन गेमवर व्यापक बंदी घालण्याची शक्यता आहे. अनियंत्रित डिजिटल गेमिंगमुळे व्यसन, मानसिक त्रास, गुन्हेगारी वाढत आहे आणि हे गेमिंग तरुणांमध्ये आत्महत्यांना चालना देतात, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. २०२३ ते २०२५ दरम्यान, राज्यात अधिकृतपणे बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंगचे ९७ प्रकरणे नोंदवण्यात आली. मुंबई शहरातून सर्वाधिक प्रकरण नोंदवण्यात आली आहेत. आत्महत्या, हिंसक घटना आणि सक्तीच्या डिजिटल गेमिंगशी संबंधित आर्थिक फसवणूक हे गंभीर मुद्दे आहेत. याचाच विचार करून आता सरकार कठोर पावलं उचलणार आहे.