
Youtube आणि Disney मध्ये वाढला तणाव! कंपनीच्या निर्णयाचा युजर्सवर होणार परिणाम, 31 ऑक्टोबरपासून नाही दिसणार हे लोकप्रिय चॅनेल्स
गुगलच्या मालकीचे व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आणि Disney यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूशनबाबत वाद सुरु झाला होता. आता हा वाद प्रचंड वाढला आहे. व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आणि लाईव्ह टिव्ही यांच्यातील वादाचा परिणाम युजर्सवर होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. हा वाद वाढत असतानाच आता Disney ने याबाबत एक चेतावणी देखील जारी केली आहे. Disney ने सांगितलं आहे की, जर दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला नाही तर युट्यूबवरील Disney चे लोकप्रिय चॅनेल्स बंद केले जाणार आहेत. याचा परिणाम 8 मिलियनहून जास्त युजर्सवर होणार आहे. हे युजर्स युट्यूबवर त्यांचे आवडते चॅनेल्स बघू शकणार नाहीत.
Chhath Puja 2025: घरबसल्या तयार करा तुमचे आवडते फोटो, महागड्या DSLR चीही गरज नाही! फॉलो करा या टिप्स
डिस्नेने 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून YouTube टीव्हीवर चेतावनी जारी करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, ही गुगलवर दबाव आणण्याची एक युक्ती असल्याचं सांगितलं जात आहे. Disney चं म्हणणं आहे की, 30 ऑक्टोबर रात्री 11:59 वाजेपर्यंत Disney आणि गूगल यांच्यामध्ये स्ट्रीमिंग करार झाला नाही, तर 31 ऑक्टोबरनंतर युजर्स युट्यूबवर डिज्नीचे लोकप्रिय चॅनल्स ESPN, ABC इत्यादी पाहू शकणार नाहीत. हे चॅनेल्स युट्यूबवर ऑफ एयर होतील. याचा अर्थ युट्यूबवर या चॅनेल्सचे प्रसारण बंद केले जाईल. त्यामुळे त्यासंबंधित कंटेट युजर्सना पाहायला मिळणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
लाईव्ह टिव्ही प्लॅटफॉर्म आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यांच्यातील डिजिटल राइट्स आणि फीसबाबत Disney आणि YouTube यांच्यामध्ये हा वाद सुरु झाला आहे. Disney आणि YouTube यांच्यात सुरु असलेला हा वाद संपला नाही तर लाखो युजर्स युट्यूब टिव्हीवर Disney चे प्रमुख चॅनेल्स पाहू शकणार नाहीत. विशेष म्हणजे याचा परिणाम स्पोर्ट्स पाहणाऱ्या युजर्सवर होणार आहे. कारण या निर्णयानंतर युजर्स युट्यूबवर NFL, NBA आणि NHL सारखे स्पोर्ट्स इवेंट्स पाहू शकणार नाहीत. Disney कडे अमेरिकेचे प्रमुख आणि न्यूज चॅनेल्स आहेत.
Disney गुगलवर असा आरोप केला आहे की, कंपनी त्यांच्या फायद्यासाठी ग्राहकांचे नुकसान करत आहे. असं पहिल्यांदाच घडलं नाही. यापूर्वी देखील दोन मोठ्या कंपन्यांमध्ये डिजिटल राइट्स आणि फीस या मुद्द्यावरून वाद झाले आहेत. अलीकडेच NBC Universal, Fox Corp, TelevisaUnivision आणि YouTube यांच्यामध्ये देखील वाद झाला होता. ऑगस्ट महिन्यापासून या कंपन्यांमध्ये वाद सुरु आहेत.
या संपूर्ण प्रकरणात यूट्यूबने त्यांची बाजू मांडत सांगितलं की, कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी एक प्लॅन तयार करत आहे. कंपनी Disney सोबत नव्या करारासाठी बोलणी करत आहे. मात्र Disney ने अनेक अटी ठेवल्या आहे, ज्यामुळे सब्सक्रिप्शन चार्ज वाढू शकते. यामुळे ग्राहकांवर याचा परिणाम होऊ शकतो. YouTube हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.