
Lava SHARK 2 4G: अहो iPhone नाही, हा तर भारतीय ब्रँड! केवळ 6,999 रुपयांच्या किंमतीत मिळणार 5000mAh बॅटरी आणि दमदार फीचर्स
इंडियन स्मार्टफोन ब्रँडने त्यांच्या बजेट स्मार्टफोनमध्ये आणखी एका नवीन डिव्हाईसचा समावेश केला आहे. कंपनीने आज 27 ऑक्टोबर रोजी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन शार्क सीरीजचा लेटेस्ट बजेट 4G स्मार्टफोन आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत 7 हजारांहून कमी आहे. कमी किंमतीत हा स्मार्टफोन त्यांच्या युजर्सना दमदार फीचर्स ऑफर करणार आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Lava SHARK 2 4G या नावाने लाँच करण्यात आला आहे.
आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर
Lava SHARK 2 4G हा स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आलेल्या डिव्हाईसचा अपग्रेड असल्याचं सांगितलं जात आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.75-इंच HD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे. यासोबतच या फोनमध्ये अनेक अपग्रेड फीचर्स देण्यात आले आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे या फोनची किंमत जी या किमतीत काही आश्चर्यकारक वैशिष्ट्ये देत आहे. स्मार्टफोनमध्ये 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, जे माइक्रोएसडी कार्डसह 2TB पर्यंत एक्सपेंडेबल वाढवले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – X)
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.75-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहेत. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह अँड्रॉइड 15 चा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये पावर देण्यासाठी 1.8 GHz ऑक्टा-कोर UNISOC T7250 12nm प्रोसेसर, माली-G57 MP1 GPU चा वापर करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये तुम्हाला 4GB पर्यंत रॅम, 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, जे माइक्रोएसडी कार्डसह 2TB पर्यंत एक्सपेंडेबल वाढवले जाऊ शकते.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर कंपनी या स्मार्टफोनमध्ये 50MP रियर कॅमेरा आणि LED फ्लॅश ऑफर करत आहे. तर सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 8MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 3.5mm ऑडियो जॅकसह FM रेडियो, बॉटम-पोर्टेड स्पीकर देण्यात आला आहे. हे डिव्हाईस डुअल 4G VoLTE, वाय-फाय 802.11 b/g/n (2.4GHz), ब्लूटूथ 5.2, GPS, USB टाइप-C ला सपोर्ट करतो. याशिवाय या लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या डिव्हाईसमध्ये 18W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
लावा शार्क 2 4G एक्लिप्स ग्रे आणि ऑरोरा गोल्ड रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6,999 रुपये आहे. हे डिव्हाईस ऑक्टोबरपासून सर्व लावा रिटेल स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.