Facebook युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता पावसर्डशिवाय अकाऊंटवर करू शकता लॉगिन, Meta घेऊन आलाय नवीन फीचर
टेक कंपनी मेटाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकसाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे नवीन फीचर पासकी (passkey) आहे. कंपनीने याबाबत अधिकृतपणे घोषणा केली असून हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी सुरु करण्यात आलं आहे. या फीचरनंतर आता युजर्सना त्यांच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करण्यासाठी पासवर्डची गरज भासणार नाही.
नवीन फीचर यूजर्सना त्यांच्या स्मार्टफोनवर आधीपासूनच सेट केले गेलेले फिंगरप्रिंट, फेसलॉक किंवा PIN चा वापर करून अकाऊंटमध्ये लॉगिन करण्याची परवानगी देते. हे फीचर युजर्सना नवीन पद्धतीने लॉगिन करण्याची परवानगी देते. मेटाने सांगितलं आहे की, पासकी लवकरच फेसबुकसाठी iOS आणि Android मोबाईल डिव्हाइसेसवर उपलब्ध होणार आहे आणि येत्या काही महिन्यांत मेसेंजरवर देखील पासकी फीचर सुरु करण्याची कंपनीची योजना आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पासकी फीचरच्या मदतीने युजर्स पासवर्डशिवाय लॉगिन करू शकतात. यावेळी युजर्सची ओळख पटवण्यासाठी फोनमधील इन-बिल्ट ऑथेंटिकेशन टूल्सचा वापर केला जातो, जसं की फिंगरप्रिंट, फेसलॉक किंवा डिव्हाईसचा पिन. हे क्रेडेन्शियल्स सर्व्हरवर नाही तर तुमच्या डिव्हाईसवर स्टोअर केले जातात, ज्यामुळे ते अधिक सुरक्षित होतात आणि फिशिंग आणि इतर सायबर हल्ले रोखण्यास मदत होते. या फीचरच्या मदतीने युजर्सच्या सुरक्षेत आणखी वाढ होते.
यूजर्स लवकरच मेटा पे (Meta Pay) सह पेमेंटची माहिती ऑटोफिल करण्यासाठी, मॅसेंजरमधून लॉगिन करण्यासाठी आणि तुमचा मेसेज बॅकअप सुरक्षित करण्यासाठी पासकीचा वापर करू शकणार आहेत.
Samsung ला टक्कर देणार Honor, या दिवशी लाँच करणार नवा स्मार्टफोन! असे आहेत खास फिचर्स
Google, Microsoft, Amazon आणि PayPal सारख्या मोठ्या टेक कंपन्या आधीपासूनच त्यांच्या युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी पासकी फीचरचा वापर करत आहेत. आता मेटाने देखील त्यांच्या युजर्ससाठी हे नवीन फीचर सुरु केलं आहे. गूगल 2022 पासून पासकीचा वापर करत आहे. तर X, eBay आणि इतर प्लॅटफॉर्म देखील फार पूर्वीपासूनच या फीचरचा वापर करत आहेत. मेटाने गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपवर पासकी फीचरचा सपोर्ट सुरु केला होता. आता ते फेसबुक आणि मेसेंजरवरही आणले जात आहे.