Samsung ला टक्कर देणार Honor, या दिवशी लाँच करणार नवा स्मार्टफोन! असे आहेत खास फिचर्स
चीनी स्मार्टफोन ब्रँड Honor आता सॅमसंगला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी आता लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. याबाबत स्मार्टफोन ब्रँडने त्यांच्या Weibo हँडलद्वारे माहिती दिली आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Honor Magic V5 या नावाने लाँच केला जाणार आहे. हा फोन पुढील महिन्यात लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हा लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. कंपनीने Weibo वर फोल्डेबल स्मार्टफोनची स्लिम डिझाईन देखील सादर केली आहे. Honor Magic V5 स्मार्टफोन हा गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Magic V3 चा सक्सेसर असणार आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. यामध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. Honor Magic V5 चीनमधे 2 जुलै रोजी लाँच केला जाणार आहे. स्मार्टफोनचा लाँच इवेंट लोकल टाइमनुसार संध्याकाळी 7:00 वाजता (IST दुपारी 4:30 वाजता) सुरू होणार आहे. कंपनीने चीनमधे ऑफिशियल स्टोरद्वारे फोल्डेबल स्मार्टफोनसाठी प्री-रिजर्वेशन्स सुरू केलं आहे. (फोटो सौजन्य – X)
Honor Magic V5 Foldable. pic.twitter.com/lk7ViVWohE
— Abhishek Yadav (@yabhishekhd) June 20, 2025
Honor चे CEO James Li ने MWC Shanghai 2025 इवेंटदरम्यान Magic V5 चा टीझर शेअर केला आहे. ज्यामुळे लॉचिंग पूर्वी स्मार्टफोनची झलक पाहायला मिळाली आहे. टीझरमध्ये कॅमेरा आयलँड बाहेर दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या कोपऱ्यावर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन दिसत आहे. असा दावा केला जात आहे की, हा स्मार्टफोन मार्केटमधील सर्वात पातळ आणि हलका स्मार्टफोन असणार आहे.
फोनमधे AI-बेस्ड फीचर्स आणि ‘PC-लेवल प्रोडक्टिविटी’ देखील असण्याची शक्यता आहे. Honor Magic V5 ला Samsung Galaxy Z Fold 7 चा प्रतिस्पर्धी मानला जात आहे. हा स्मार्टफोन अनफोल्ड झाल्यावर 3.9mm आणि फोल्ड झाल्यावर 8.9mm थिकनेस देतो. Magic V5 चे डायमेंशन्स अद्याप क्लियर नाही.
Honor Magic V5 बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला हा स्मार्टफोन Geekbench वेबसाइटवर MHG-AN00 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला होता. लिस्टिंगमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट आणि 16GB RAM चा उल्लेख करण्यात आला आहे.
फोनमध्ये Android 15 OS आणि IPX8-रेटेड बिल्ड असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,100mAh बॅटरी 66W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, Honor Magic V5 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा युनिट असेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो शूटर असेल. या स्मार्टफोनमध्ये 6.45-इंचाचा LTPO OLED कव्हर स्क्रीन आणि 8-इंचाचा 2K इनर डिस्प्ले असेल असे म्हटले जाते.