
Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम
Jio Recharge Plan: 30 रुपयांहून कमी किंमत आणि फायदे अफाट… हे आहेत जिओचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स
कंपनीने अलीकडेच त्यांची प्रायव्हसी पॉलिसी अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यूजर इंटरफेसवरून डेटा गोळा केला जाणार आहे, जो यूजरच्या इंटरेक्शनवर आधारित जाहिराती टार्गेट करणार आहे. नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार, यूजरच्या इंटरेक्शनवर आधारित एआई टेक्नोलॉजीच्या मदतीने डेटा कलेक्ट केला जाणार आहे. यामध्ये प्लॅटफॉर्मवर करण्यात आलेले इंटरेक्शन जसे की प्रश्न, मेसेज आणि मीडिया शेयरिंगच्या आधारावर जाहिराती दाखवल्या जाणार आहेत. हा डेटा कंपनी यूजरच्या प्राफाईल मेटाडेटावरून गोळा करणार आहे आणि जाहिराती दाखवणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मेटाने काही दिवसांपूर्वीच Meta AI त्यांच्या सोशल मीडिया आणि इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये इंटिग्रेट केले आहे. कंपनीच्या नव्या पॉलिसीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, ‘AI at Meta’ मुळे यूजरच्या संभाषणांवर आणि परस्परसंवादांवर आधारित वैयक्तिकृत जाहिराती प्रदर्शित केल्या जातील. कंपनीने गेल्या ऑक्टोबरमध्ये यूजरसोबत या बदलाची माहिती शेअर केली होती. मेटाच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे यूजर्सची सुरक्षा कमी होत आहे. कारण यामध्ये, वापरकर्त्याने एआय द्वारे पाठवलेल्या व्हॉइस चॅट आणि टेक्स्ट मेसेजच्या मेटा डेटामध्ये प्रवेश करून जाहिरातींच्या शिफारसी दिल्या जातील. कंपनीने सांगितलं आहे की, यूजर्सना आता केवळ त्याच जाहिराती दाखवल्या जाणार आहेत, ज्याची त्यांना आवड आहे. यूजर्सना आता त्या जाहिराती दाखवल्या जाणार नाही, ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.
मेटाने उदाहरण देत स्पष्ट केलं आहे की, जर तुम्ही मेटा एआयला हायकिंगबद्दल काही विचारले तर तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर हायकिंगसंबंधित जाहिराती दिसणार आहेत. तुम्हाला हायकिंगसाठी शॉपिंग करणाऱ्या जाहिराती दाखवल्या जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही हायकिंगला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही या वस्तू खरेदी करू शकाल. कंपनीचं असं म्हणणं आहे की, पर्सनलाइज्ड जाहिराती यूजर्सच्या आवडीनुसार दाखवल्या जाणार आहेत. ज्यामुळे त्यांना प्रोडक्ट खरेदी करण्यात मदत मिळू शकेल. याशिवाय, कंपनी यूजरना जाहिरातींबाबत माहिती इन-प्रॉडक्ट नोटिफिकेशन तसेच ई-मेलद्वारे देखील पाठवेल.
Ans: अनावश्यक माहिती शेअर करू नये, Privacy Settings नियमित तपासाव्यात आणि संशयास्पद लिंक्सपासून दूर राहावे.
Ans: अधिक वैयक्तिक कंटेंट, चांगले रेकमेंडेशन्स आणि स्मार्ट फीचर्स मिळतात.
Ans: होय, Facebook किंवा Instagram वापरण्यासाठी पॉलिसी स्वीकारावीच लागते.