Jio Recharge Plan: 30 रुपयांहून कमी किंमत आणि फायदे अफाट... हे आहेत जिओचे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स
UTS अॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स
कंपनीच्या 4G डेटा वाउचरची किंमत केवळ 11 रुपयांपासून सुरु होते. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा तीन डेटा व्हाऊचर प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 30 रुपयांहून कमी आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना केवळ डेटा प्लॅन मिळणार आहेत. या प्लॅन्सची किंमत 11 रुपये, 19 रुपये आणि 29 रुपये आहे. हे डेटा व्हाऊचर आहेत. त्यामुळे या प्लॅनमध्ये कोणतीही सर्विस व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार नाही. चला तर मग या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दस जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिलायंन्स जिओच्या 11 रुपयांच्या डेटा व्हाऊचर प्लॅनमध्ये केवळ 1 तासाची सर्विस व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 तासासाठी अनलिमिटेड डेटा ऑफर केला जातो. पण अनेकांनी असं सांगितलं आहे की, या प्लॅनमध्ये 1 तासासाठी केवळ 10GB डेटा ऑफर केला जातो. FUP (फेयर यूसेज पॉलिसी) डेटा संपल्यानंतर स्पीड 64 Kbps होते.
रिलायंन्स जिओच्या 19 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 1GB डेटा आणि 1 दिवसाची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन तुम्हाला अशावेळी फायद्याचा ठरणार आहे, जेव्हा तुमचा FUP डेटा संपला आहे आणि डेटा रीसेट करण्यापूर्वी तुम्हाला आणखी काही डेटाची आवश्यकता आहे.
नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
रिलायंन्स जिओच्या 29 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 2 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना केवळ 2GB डेटा मिळतो. तुम्ही अपात्कालीन परिस्थितीत या प्लॅनचा वापर करू शकता. लक्षात ठेवा की या सर्व डेटा व्हाऊचरचा वापर करण्यासाठी तुनच्याकडे अॅक्टिव्ह डेटा प्लॅन असणं अत्यंत गरजेचं आहे. अॅक्टिव्ह बेस प्लॅनशिवाय, यूजर्स या प्रीपेड डेटा प्लॅनचे डेटा फायदे घेऊ शकणार नाहीत. हे प्लॅन प्रत्येक टेलिकॉम सर्कलमधील प्रत्येक ग्राहकासाठी लागू आहेत.
Ans: MyJio App, Jio वेबसाइट, UPI, मोबाईल वॉलेट किंवा रिटेल स्टोअरमधून रिचार्ज करता येतो.
Ans: 11 रुपयांपासून कंपनीच्या 4G डेटा वाउचरची किंमत सुरु होते.






