Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
Grok बनवलेला बिकिनी फोटो शेअर करत मस्कने त्याला परफेक्ट असा रिप्लाय देखील केला आहे. एवढंच नाही तर यूजर्स अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींचे फोटो देखील तयार करत आहेत. ज्यामध्ये बिल गेट्सच्या नावाचा देखील समावेश आहे. या ट्रेंडमुळे सध्या एक्सवर अशा प्रकारच्या बिकीनी फोटोंचा पूर आला आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पण मजा मस्ती करण्यासाठी सुरु झालेला हा ट्रेंड अतिशय धोकादायक ठरू शकतो. या ट्रेंडमधील मजा जेवढी लोकांना आवडत आहे, त्यासोबतच या ट्रेंडमध्ये काही चुकीचे फोटो देखील तयार केले जाऊ शकतो. त्यामुळे सध्या यूजर्स चिंतेत आहेत आणि मस्कचा हा नवीन ट्रेंड वादाचा विषय ठरला आहे. (फोटो सौजन्य – X)
🤣🤣 https://t.co/b6ikV7IFkR — Elon Musk (@elonmusk) January 1, 2026
हा ट्रेंड सध्या एक गंभीर मुद्दा बनला आहे. मजा मस्ती आणि ट्रेंडचा दुरुपयोग यांच्यात एक अत्यंत पातळ रेषा आहे. अनेक यूजर्सनी ही रेषा ओलांडली आहे. रिपोर्ट्सनुसार, काही लोक महिलांच्या संमतीशिवाय त्यांच्या छायाचित्रांमध्ये आक्षेपार्ह बदल करण्याची मागणी करत आहेत. अशा देखील काही घटना घडत आहेत, जेव्हा यूजर्स महिलांचे फोटो इंटरनेटवरून घेत आहेत आणि या फोटोंमध्ये काही आक्षेपार्ह बदल करण्याच्या विनंत्याही करत असतात. याच कारणामुळे आता हा नवीन ट्रेंड आता महिलांच्या सूरक्षेचा विषय बनला आहे. या नवीन ट्रेंडमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचे म्हटलं जात आहे.
अनेक तज्ज्ञांनी असे देखील म्हटलं आहे की हे टूल विनोद म्हणून वापरले जात असले तरी, कमकुवत गार्डरेल्ससह अशा वैशिष्ट्यांमुळे समाजात गैरवापर वाढू शकतो. हा ट्रेंड चुकीच्या पद्धतीने वापरून लोकांची फसवणूक केली जाऊ शकते. सध्या या केवळमुळे AI सुरक्षा, परवानगी आणि जबाबदार वापर अशा गोष्टींवर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे. xAI ने Grok च्या या ट्रेंडबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिले नाही. पण हे स्पष्ट आहे की हे प्रकरण विनोदाच्या पलीकडे गेले आहे आणि एआयच्या नैतिक रेलिंगबद्दल गंभीर चर्चा सुरू केली आहे.






