Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meta Instagram Update: सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा,

केंद्र सरकारच्या नोटिसीनंतर Meta ने बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंटविरोधातील आपल्या कारवाईबाबत सविस्तर भूमिका मांडली आहे. कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे लाखो संशयित अकाऊंट्स, कोट्यवधी आक्षेपार्ह पोस्ट हटवल्याचा दावा करत आरोपांना उत्तर दिले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 01:18 PM
Meta Instagram Update: सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा,

Meta Instagram Update: सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा,

Follow Us
Follow Us:
  • मेटाने ब्लॉगद्वारे बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंटविरोधातील कारवाईची माहिती देत 40 लाखांहून अधिक संशयास्पद अकाऊंट हटवल्याचा दावा केला.
  • कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात 3.6 कोटींहून अधिक आक्षेपार्ह कंटेंट हटवण्यात आला असून 96% कंटेंट तक्रार येण्यापूर्वीच हटवण्यात आला.
  • केंद्र सरकारच्या नोटिसीनंतर मेटाने आरोप फेटाळत आपल्या AI प्रणालीद्वारे संशयित अकाऊंट्स आणि जाहिरातींवर सातत्याने कारवाई होत असल्याचे स्पष्ट केले.
Meta Update: मेटाने मंगळवारी 7 जुलै रोजी एक सविस्तर ब्लॉग जारी केला आहे. या ब्लॉगमध्ये कंपनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बाल लैंगिक शोषण आणि गैरवापराशी संबंधित कंटेट विरोधात काय कारवाई करत आहे, याबाबत सांगितलं आहे. अलीकडेच केंद्र सरकारने मेटाला इंस्टाग्रामवर मुलांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर (CSAM) असलेल्या जाहिराती शेअर केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. या नोटीसवर 7 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. आता कंपनीने या सर्वांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी एक ब्लॉग शेअर केला आहे.

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत

मेटाने शेअर केला ब्लॉग

मेटाने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बाल लैंगिक शोषण हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. कंपनी रोज त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अशा कंटेटविरोधात कारवाई करते. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांना भारतात इंस्टाग्राम जाहिरातींंसंदर्भातील अलीकडील अहवालांची माहिती आहे. त्यांच्या धोरणांचे उल्लंघन करणारी कोणतीही जाहिरात किंवा कंटेंट प्लॅटफॉर्मवरून वेळीच काढून टाकली जाते.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

40 लाखांहून अधिक संशयास्पद अकाऊंट हटवले- मेटाचा दावा

मेटाने दावा केला आहे की, गेल्या वर्षभरात त्यांनी जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून 40 लाखांहून अधिक संशयास्पद अकाऊंट हटवले आहेत. याशिवाय, बाल लैंगिक शोषणासंबंधित 3.60 करोडहून अधिक कंटेट देखील हटविण्यात आला आहे. भारतातबाबत कंपनीने म्हटलं आहे की, गेल्या 6 महिन्यात एआय टूल्सच्या मदतीने 1.60 लाख अकाऊंट हटविण्यात आले आहेत, जे बाल लैंगिक शोषणासंबंधित संशयास्पद हालचालींची लिंक शेअर करत होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या दरम्यान फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून बाल लैंगिक शोषणासंबंधित 1 करोड 30 लाख कंटेंट हटविण्यात आला आहे. यामध्ये 96 टक्के कंटेट असा आहे, जो यूजर्सच्या तक्रारी प्राप्त होण्यापूर्वीच कंपनीने स्वत:च हटवला आहे.

मेटाने आरोप फेटाळले

मेटाने कंपनीवर करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत, म्हटलं आहे की, अयोग्य आवड असलेल्या लोकांना कंपनी जाणूनबूजून मुलांशी संबंधित जाहिराती दाखवते, हा आरोप मेटाने फेटाळून लावला आहे. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांची सिस्टिम अशा संशयास्पद अकाऊंटची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तयार केली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, त्यांच्या या सिस्टिमने नियम तोडणाऱ्या अनेक जाहिराती आणि त्यासंबंधित अकाऊंटवर आधीच कारवाई केली आहे. यादरम्यान, अनेक जाहिराती हटवण्यात आल्या आणि काही अकाऊंट देखील बंद करण्यात आले, तसेच आक्षेपार्ह कंटेंटशी संबंधित यूआरएल ब्लॉक करण्यात आले आहेत.

कायदेशीर संस्थांनाही पाठवली जाते माहिती

मेटाने सांगितलं आहे की, जेव्हा त्यांना कधीही मुलांशी संबंधित प्रकरण आढळते, तेव्हा त्याची माहिती, अमेरिकेची संथ्या NCMEC ला दिली जाते. भारतात ही माहिती NCMEC द्वारे राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलपर्यंत पोहोचवली जाते.

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, इंस्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेटला प्रोत्साहन देणाऱ्या आणि यूजर्सना इतर प्लॅटफॉर्मवर पुनर्निर्देशित करणाऱ्या सशुल्क जाहिराती सुरू होत्या, त्यानंतर हा वाद सुरू झाला. यानंतर, 4 जुलै रोजी, मंत्रालयाने मेटाला नोटीस बजावून, CSEAM शी संबंधित सर्व जाहिराती आणि मजकूर तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले. कंपनीला सात दिवसांच्या आत सविस्तर उत्तर सादर करण्यासही सांगण्यात आले. या नोटीसवर मेटाने अद्याप अधिकृतपणे उत्तर दिलं नसलं तरी याबाबत आता एक ब्लॉग पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

Web Title: Meta responds after government notice claims removal of over 4 million suspicious accounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • instagram
  • meta
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: नवा टास्क इव्हेंट लाईव्ह; मोफत अनलॉक करा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स
1

Free Fire Max: नवा टास्क इव्हेंट लाईव्ह; मोफत अनलॉक करा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

व्हायरल दुबई चॉकलेटपासून शुगर-फ्री बार्सपर्यंत! काय म्हणतो Instamart चा रिपोर्ट? आकडेवारी केली प्रसिद्ध
2

व्हायरल दुबई चॉकलेटपासून शुगर-फ्री बार्सपर्यंत! काय म्हणतो Instamart चा रिपोर्ट? आकडेवारी केली प्रसिद्ध

250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?
3

250 वर्षांसाठी जमिनीत पुरलं टाइम कॅप्सूल! आतमध्ये ठेवलाय iPhone 17 Pro Max, 2276 मध्येही होणार सुरु?

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे
4

Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.