Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Microsoft ने पाकिस्तानला केलं बाय-बाय! 25 वर्षांचं नात अखेर संपल, कंपनीने सांगितलं हे कारण; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे, ज्याचे कामकाज 190 हून अधिक देशांमध्ये आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सायबर सुरक्षा, सॉफ्टवेअर अशा अनेक क्षेत्रांमध्ये ही कंपनी आघाडीवर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2025 | 09:44 AM
Microsoft ने पाकिस्तानला केलं बाय-बाय! 25 वर्षांचं नात अखेर संपल, कंपनीने सांगितलं हे कारण; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Microsoft ने पाकिस्तानला केलं बाय-बाय! 25 वर्षांचं नात अखेर संपल, कंपनीने सांगितलं हे कारण; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Follow Us
Close
Follow Us:

Microsoft Shuts Down In Pakistan: टेक्‍नोलॉजीच्या जगातील सर्वात मोठं नाव असलेली मायक्रोसॉफ्ट कंपनी पाकिस्तानमधून बाहेर आली आहे. म्हणजेच कंपनीने पाकिस्तानमधील कामकाज बंद केलं आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीने याबाबत आधीच संकेत दिले आहेत. याशिवाय कंपनीतील कर्मचाऱ्यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली होती. सुमारे 25 वर्षांपासून सुरु असलेले आपलं कामकाज कंपनीने आता थांबवलं आहे. टेक रडारच्या रिपोर्टनुसार, पाकिस्‍तानमध्ये माइक्रोसॉफ्टचे ऑपरेशन बंद करण्यात आले आहे. आता इथे केवळ एक ऑफीस आहे. या ऑफीसमध्ये केवळ 5 कर्मचारी आहेत. मायक्रोसॉफ्टने घेतलेला हा निर्णय पाकिस्‍तानातील टेक इंडस्‍ट्रीला लागलेला सर्वात मोठा धक्का आहे.

OMG! डिजिटल डिस्प्लेसह लाँच झाली भारतातील पहिली Smart Ring, हार्ट रेट करते मॉनिटर; केवळ इतकी आहे किंमत

रहमानची लिंक्डइन पोस्ट

मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षांपूर्वी माइक्रोसॉफ्टने पाकिस्तानात कामकाज सुरु केले होते. त्यावेळी जावेद रहमान नावाच्या व्यक्तीने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांची गणना मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानच्या संस्थापकांमध्ये केली जाते. रहमानच्या लिंक्डइन पोस्टमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्या अनेक प्रश्न उपस्थित करतात.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

पोस्टमध्ये काय म्हटलं?

जव्‍वाद रहमान यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे की, एक काळ आता संपला आहे. 25 वर्षांपूर्वी जून महिन्यात मला पाकिस्तानमध्ये मायक्रोसॉफ्ट लाँच करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता हे कामकाज थांबवण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे की, मायक्रोसॉफ्टचे पाकिस्तानातील कामकाज थांबवले जाणार आहे याबाबत कंपनीतील उर्वरित कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. त्यांनी लिहिले की कंपनीचा हा निर्णय विचार करण्यास भाग पाडतो.

Microsoft आणि Apple ला टाकलं मागे! Nvidia ने बनवला नवा रेकॉर्ड, इतिहास बदलणार का?

रहमानने दिलेल्या माहितीनुसार, हे आपल्या देशाने निर्माण केलेल्या वातावरणाचे प्रतिबिंब आहे. असे वातावरण ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीलाही अस्थिरता दिसते. ते म्हणाले की, आता पाकिस्तानबाबत काय बदल होत आहेत हा प्रश्न विचारला पाहिजे, असे काय आहे ज्यामुळे या महाकाय कंपनीला देश सोडावा लागला. तथापि, मायक्रोसॉफ्टकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, कंपनी लवकरच याबाबत अधिकृतपणे माहिती देऊ शकते.

ही असू शकतात कारणं

जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने 7 मार्च 2000 रोजी पाकिस्तानमध्ये आपले कामकाज सुरू केले, परंतु 3 जुलै 2025 रोजी, कोणतीही औपचारिक घोषणा न करता, कंपनीने पाकिस्तानमधून आपले कामकाज पूर्णपणे बंद केले आहे. राजकीय आणि आर्थिक अस्थिरता हे कंपनीच्या निर्णयामागील मुख्य कारणं मानलं जात आहे. मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे कोणतेही कारण सांगितले नाही, परंतु उद्योग तज्ञांचा असा विश्वास आहे की पाकिस्तानची अस्थिर अर्थव्यवस्था, राजकीय अस्थिरता आणि कमकुवत व्यावसायिक वातावरण ही यामागील प्रमुख कारणे आहेत.

Web Title: Microsoft shuts down pakistan operations after 25 years what is the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • Microsoft
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स
1

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
2

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर
3

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…
4

Flipkart Offers: अशी संधी पुन्हा मिळणं कठीण! डिस्काऊंटसह खरेदी करा OnePlus 13, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्स कॉम्बिनेशन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.