Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमाल आहेत हे Mivi Earbuds, गाणी ऐकण्यासाठी स्मार्टफोनची गरजही नाही! अशा प्रकारे करणार काम

Hi Mivi Earbuds Launched: हाय मिव्ही एआय बड्स एक स्मार्ट डिव्हाइस आहेत. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला केवळ इंटरनेटची गरज असणार आहे. कंपनीने अधिकृतपणे अद्याप या इअरबडची किंमत जाहीर केली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 16, 2025 | 12:40 PM
कमाल आहेत हे Mivi Earbuds, गाणी ऐकण्यासाठी स्मार्टफोनची गरजही नाही! अशा प्रकारे करणार काम

कमाल आहेत हे Mivi Earbuds, गाणी ऐकण्यासाठी स्मार्टफोनची गरजही नाही! अशा प्रकारे करणार काम

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या काळात इअरबड वापरणं ही एक सामान्य गोष्ट आहे. ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा ऑफीसमध्ये तुम्ही प्रत्येक व्यक्तिच्या कानात त्याच्या आवडत्या कंपनीचे इअरबड पाहू शकता. इअरबड वापरणं सामान्य गोष्ट असली तरी AI इअरबड वापरण्यात एक वेगळीच मजा आहे. नुकतेच लाँच करण्यात आलेले Hi Mivi हे AI इअरबड अतिशय खास आहेत, आणि हे Apple च्या Siri आणि Amazon च्या Alexa पेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. हे नवे AI इअरबड Mivi ने लाँच केले आहेत.

Samsung One UI 7 च्या रिलीजबाबत समोर आली मोठी अपडेट! युजर्सची वाढली चिंता, X पोस्ट व्हायरल

Hi Mivi अशा प्रकारे काम करतात

हे एआय इअरबड आवाजाने नियंत्रित केले जाऊ शकते. तुम्ही फक्त एका प्रॉम्प्टने बिर्याणी आणि इतर अनेक गोष्टी बनवायला शिकू शकता. हे एआय इअरबड कंपनीच्या 100 हून अधिक अभियंत्यांनी तयार केले आहे. ज्याला सुमारे 18 महिन्यांचा कालावधी लागला असून हे एआय इअरबड्स बनवण्याचा खर्च सुमारे 100 कोटी रुपये आहे. (फोटो सौजन्य –Mivi)

हाय मिव्ही एआय बड्स स्वतःच एक स्मार्ट डिव्हाइस

दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट झाल्यावर हे इअरबड आपोआप चालू होईल. सिरी आणि अलेक्सा स्मार्टफोनशी कनेक्ट होतात, तर हाय मिव्ही एआय बड्स स्वतःच एक स्मार्ट डिव्हाइस आहेत. कानात टाकल्यानंतर फक्त इंटरनेटची आवश्यकता आहे, फोनची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही हे इअरबड इंटरनेटसोबत कनेक्ट करून कानात घाला आणि यानंतर हे इअरबड तुम्हाला अनेक कामांसाठी मदत करणार आहे.

स्टेप बाय स्टेप स्वयंपाक मदत करेल

तुम्ही या इअरबडला एखादी रेसिपी विचारली तर हे इअरबड तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या पदार्थाची संपूर्ण रेसिपी सांगणार आहे. अगदी कोणत्या भाज्या कापायच्या आहेत आणि किती वेळ शिजू द्यायच्या आहेत, या सर्वाबद्दल हे इअरबड तुम्हाला माहिती देणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये टाईप करून काही सर्च करण्याची देखील गरज नाही. तुम्ही या AI इअरबडला प्रॉम्प्ट देऊन अनेक गोष्टींची माहिती मिळवू शकता.

WhatsApp युजर्सना मिळालं मोठं गिफ्ट! iPhone आणि Android साठी आले 6 नवे फीचर्स, मेसेजिंग आणि कॉलिंग आता होणार अधिक मजेदार

Hi Mivi च्या मदतीने, तुम्ही फक्त आवाज देऊन तुमच्या आईच्या हातांसारखी बिर्याणी बनवायला शिकू शकाल. जर तुम्हाला तुमच्या आईची आठवण येत असेल, तर इअरबड एक अंगाईगीत गाईल. होय, हे इअरबड तुम्ही दिलेल्या प्रॉम्प्टनुसार अंगाईगीत देखील गाणार आहे. हे एआय बड्स हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आणि 1000 हून अधिक भारतीय बोलींमध्ये बोलू शकते. हे बड्स तुम्हाला ताज्या बातम्यांबद्दल देखील माहिती देऊ शकतात. ज्यामुळे जगात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला टिव्ही पाहण्याची देखील आवश्यकता असणार नाही.

इअरबड माणसांसारखा भावनिकपणेही बोलेल. ते माणसांसारखे भावनिकपणे बोलून समस्येचे निराकरण देखील सांगेल. इअरबडच्या किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान असेल. मात्र कंपनीने अधिकृतपणे अद्याप या इअरबडची किंमत जाहीर केली नाही. या महिन्याच्या अखेरीस इअरबड बाजारात उपलब्ध होईल. एमआयव्ही एआयचे सह-संस्थापक विश्वनाथ कंडुला म्हणाले की, एआय बड्स बनवण्याचा उद्देश भारतीयांना आपलेपणाची भावना निर्माण करणे आहे.

Web Title: Mivi new earbuds launched know about price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • earbuds
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज
1

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस
2

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
3

7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… Realme चा तगडा स्मार्टफोन भारतात लाँच; वाचा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला ईवो वॉल्ट ईव्हेंट… प्रीमियम गन स्किनसह प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.