Samsung One UI 7 च्या रिलीजबाबत समोर आली मोठी अपडेट! युजर्सची वाढली चिंता, X पोस्ट व्हायरल
तुम्ही देखील सॅमसंग युजर आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या सर्व सॅमसंग युजर्स लेटेस्ट One UI 7 अपडेटची वाट पाहत आहेत. 7 एप्रिल रोजी कंपनीने काही निवडक डिव्हाईससाठी अमेरिकेत हे अपडेट जारी केलं होतं. यामध्ये Galaxy S24 सिरीज, Galaxy Z Flip 6 आणि Z Fold 6 साठी हे अपडेट जारी केलं होतं. यानंतर कंपनीने देशांची आणि डिव्हाईसची यादी शेअर केली होती, ज्यामध्ये सांंगण्यात आलं होतं की, हे अपडेट कोणत्या स्मार्टफोनसाठी कधी रिलीज केला जाईल आणि कोणत्या दिवशी कधी रिलीज केला जाईल. या यादीनंतर प्रत्येकजण या नव्या अपडेटची वाट पाहत होते. मात्र आता सर्व सॅमसंग युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
कंपनीने One UI 7 अपडेटचं रिलीज थांबवलं आहे. कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये गॅलेक्सी S24 सीरीजसाठी स्टेबल One UI 7 अपडेटचं रोलआऊट काही काळासाठी थांबवलं आहे. हे अपडेट अमेरिका आणि दक्षिण कोरियात रिलीज करण्यात आलं. यानंतर इतर देशातील सॅमसंग युजर्सना अशी आशा होती की, हे नवीन अपडेट त्यांच्या देशात देखील रिलीज केलं जाईल. मात्र आता कंपनीने या अपडेटचं रोलआऊट थांबवलं आहे. या अपडेटमध्ये एक बग सापडल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
@UniverseIce नावाच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये एका टिपस्टरने सांगितलं आहे की,नवीन One UI 7 अपडेटमध्ये कंपनीला ‘Serious Bug’ आढळला आहे. त्यामुळे आता या अपडेटचे रिलीज इतर देशांमध्ये काही काळासाठी थांबवण्यात आलं आहे.
Sudden!
After the Korean Galaxy S24 series firmware was pushed, a serious bug was found, which led to the suspension of the push plan in all other countries, including China.— I’m back! (@UniverseIce) April 14, 2025
टिपस्टर UniverseIce ने त्याच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जेव्हा दक्षिण कोरियामध्ये गॅलेक्सी S24 अल्ट्रा आणि लाइनअपमधील इतर दोन मॉडेल्ससाठी One UI 7 अपडेट जारी करण्यात आलं तेव्हा कंपनीला यामध्ये एक बग आढळला. यानंतर आता कंपनीने चीनसह इतर देशांमध्ये या अपडेटचं रोलआऊट थांबवलं आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी या बगवर काम करत असून लवकरच हे बग दुरुस्त केलं जाईल आणि नवीन One UI 7 अपडेट जारी केलं जाईल.
एक्सवर करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अपडेटमध्ये आढळलेल्य बगबद्दल अधिक माहिती देण्यात आली नाही. मात्र टिपस्टरने एक्स पोस्टमध्ये सांगितलं आहे की, दक्षिण कोरियामध्ये अनेक यूजर्सना वन यूआई 7 अपडेटनंतर त्यांचा फोन अनलॉक करण्यात समस्या येत आहेत. अँड्रॉइड 15-बेस्ड ऑपरेटिंग सिस्टमवरप आधारित अनेक डिव्हाईस अनलॉक होत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरिया टेक्निकल ग्रुपने या समस्येवर लक्ष केंद्रित केलं आहे. तथापि, अमेरिकेतील सॅमसंग वापरकर्त्यांना त्यांच्या गॅलेक्सी एस24 फोनमध्ये अशाच प्रकारच्या अनलॉकिंग समस्या येत आहेत की नाही हे अद्याप माहित नाही.