केवळ 18 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला हा दमदार 5G Smartphone! पावरफुल बॅटरी आणि Amazing कॅमेऱ्याने सुसज्ज
मोटोरोलाने भारतात त्यांच्या G सीरीजमधील नवीन आणि एक बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Moto G86 Power या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन मीडियाटेक चिपसेट, 1.5K OLED डिस्प्ले, ट्रिपल-कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरीने सुसज्ज आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन छोटा पॅकेट मोठा धमाका आहे. म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये अनेक पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत आणि त्यांची किंमत देखील अत्यंत कमी आहे.
Moto G86 Power ची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या शोधात असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे हा एक परिपूर्ण स्मार्टफोन आहे, जो तुम्हाला कमी पैशांत उत्तम फिचर्स ऑफर करतो. (फोटो सौजन्य – X)
Moto G86 Power 5G launched in India.
• 8GB+128GB: ₹17,999
– 6.67″ 1.5k pOLED, 120Hz
– Dimensity 7400 | LPDDR4X + UFS 2.2
– 50MP LYT-600 OIS + 8MP Wide-Angle
– 32MP Selfie
– 6720mAh, 33W
– Android 15, 1+3 update policy
– Hybrid card slot, In display fps, IP69 rated pic.twitter.com/kUFd6qqz5m— Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414) July 30, 2025
स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, मोटोरोलाच्या या डिव्हाईसमध्ये 6.67 इंच pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यासोबत क्रिस्प 1.5K रेजोल्यूशन आणि स्मूथ 120Hz रिफ्रेश रेट ऑफर केले जाते. दिवसात हा डिस्प्ले अधिक चांगला अनुभव देतो. या स्मार्टफोनमध्ये 4,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर केली जाते.
Moto च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक 7400 चिपसेट देण्यात आला आहे, जो मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी अतिशय उत्तम आहे. या डिव्हाईसमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज ऑफर केले जाते. हे डेली यूजसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये तुम्हाला अँड्रॉइड 15 बेस्ड हॅलो UI ऑफर केला जातो, ज्यामध्ये मोटो जेस्चर, फॅमिली स्पेस आणि स्मार्ट कनेक्ट सारखे यूजफुल फीचर्स देखील आहेत.
स्मार्टफोनमध्ये दमदार ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS सह 50MP Sony LYTIA-600 सेंसर आणि 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरासह 2MP चा मॅक्रो लेंस देखील देण्यात आला आहे. सेल्फी लवर्ससाठी या डिव्हाईसमध्ये खास 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही 30fps वर 4K व्हिडीओ रिकॉर्डिंग देखील करू शकता. फोनमध्ये 6,720mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट सपोर्ट करते.
Bitchat Mesh: App Store वर उपलब्ध झाला नवा चॅटिंग अॅप, आता मेसेज करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही!
Moto G86 Power 5G पॅनटोन कॉस्मिक स्काई, पॅनटोन गोल्डन साइप्रस आणि पॅनटोन स्पेलबाउंड कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आहे. तथापि, तुम्ही हा फोन बँक ऑफरसह फक्त 16,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कंपनी निवडक बँकांच्या कार्डवर 1000 रुपयांची सूट किंवा एक्सचेंजवर 1000 रुपयांची अतिरिक्त सूट देत आहे. फोनचा पहिला सेल 6 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट, motorola.in आणि ऑफलाइन स्टोअर्सवर सुरू होईल.