Price Dropped: फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि पावरफुल कॅमेरा... Motorola चा हा स्मार्टफोन झाला स्वस्त, Deal मिस करू नका
तुम्हाला देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे किंवा तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करायचा आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बऱ्याच काळापासून तुम्ही जबरदस्त फीचर्स आणि फ्लॅगशिप किलर स्मार्टफोनच्या शोधात आहात का? पण जास्त किंमतीमुळे अद्याप स्मार्टफोन खरेदी केला नाही. तर आता आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि पावरफुल कॅमेरा असणारा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करू शकता.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर एक धमाकेदार डिल सुरु आहे, जिथे तुम्ही Motorola Edge 50 Ultra 5G स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात. Amazon वर Motorola Edge 50 Ultra 5G स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. इथे तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीवर 11000 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जात आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रीमियम डिझाईन, ट्रिपल रियर कॅमेरा, कर्व्ड AMOLED डिस्प्लेसह अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग स्मार्टफोनवरील डिल्स आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोटोरोलाचा हा जबरदस्त स्मार्टफोन भारतात 59,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 11,000 रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे आता तुम्ही हा प्रिमियम स्मार्टफोन केवळ 48,249 रुपयांत खरेदी करू शकणार आहात. म्हणजेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Edge 50 Ultra वर 11,750 रुपयांचं फ्लॅट डिस्काऊंट देत आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. जर तुम्ही वन कार्ड क्रेडिट कार्डवरून फोनची खरेदी करणार असाल तर 1000 रुपयांचं प्लॅट डिस्काऊंट दिलं जाणार आहे.
मोटोरोलाच्या या प्रिमियम स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 2,500 निट्सची पीक ब्राइटनेस दिली जाते. यासोबतच या डिव्हाईसमध्ये Snapdragon 8S Gen 3 चिपसेट देण्यात आली आहे. ज्यामुळे स्मार्टफोनवर मल्टीटास्किंग करणं अत्यंत सोपं होतं. फोनमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 512 जीबीपर्यंत स्टोरेज देखील आहे.
याशिवाय, या डिव्हाईसमध्ये 4500 एमएएच बॅटरीसह 125 वॉट फास्ट चार्जिंग आणि 50 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफी लवर्ससाठी डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा व्हाइट सेंसर आणि 3X ऑप्टिकल लेंसवाला 64 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देखील देण्यात आला आहे.