Price Dropped: 59,999 रुपयांचा Samsung चा हा स्मार्टफोन केवळ 35,399 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्लॅगशिप फीचर्सने सुसज्ज
टेक कंपनी सॅमसंगचा आगामी इव्हेंट unpacked 2025 पुढील महिन्यात आयोजित केला जाणार आहे. याबाबत सतत नवीन अपडेट समोर येत आहेत. अशी माहिती समोर आली आहे की या इव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे तीन नवीन स्मार्टफोन्स आणि स्मार्टवॉच लाँच करणार आहे. याशिवाय एक एअरबर्ड्स देखील लाँच केली जाण्याची शक्यता आहे.
मात्र या आगामी गॅजेट्सच्या लाँचिंगपूर्वीच आता कंपनीच्या जुन्या डिव्हाईसची किंमत कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सॅमसंगच्या एका प्रीमियम स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ही ऑफर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला सॅमसंगचे प्रीमियम फोन अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग आपण या ऑफरबद्दल आणखी जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी Samsung Galaxy S24 FE ची किंमत कमी करण्यात आली आहे. हे डिव्हाईस सप्टेंबर महिन्यात 59,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे डिव्हाईस 35,399 रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. Amazon वरून तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. या स्मार्टफोनचे 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट Amazon वर 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक ऑफर आणि नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये Exynos 2400e चिपसेट देण्यात आला आहे.
Amazon वरून तुम्ही गॅलेक्सी S24 FE चे 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेले बेस व्हेरिअंट 35,399 रुपयांना खरेदी करू शकता, या स्मार्टफोनची लाँच प्राईज 59,999 रुपये आहे. अशाच ऑफर्स स्मार्टफोनच्या इतर व्हेरिअंट्सवर देखील उपलब्ध आहेत. कंपनी काही बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांद्वारे केलेल्या खरेदीवर 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे. त्यानंतर फोनची किंमत आणखी कमी होते.
Samsung ने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गॅलेक्सी S24 FE स्मार्टफोन ब्लू, ग्रेफाइट आणि मिंट शेड्समध्ये लाँच केला होता. डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7 इंचचा फुल-HD+ डायनामिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये Exynos 2400e चिपसेट देखील देण्यात आला आहे.
गॅलेक्सी S24 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन म्हणजेच OIS सह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच, फोनमध्ये OIS आणि 3x ऑप्टिकल झूमसह 8-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. डिव्हाइसमध्ये 10-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी याला IP68 रेटिंग आहे. याशिवाय, फोनमध्ये 25W वायर्ड चार्जिंग आणि 4,700mAh बॅटरी आहे.