
सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
हा आगामी स्मार्टफोन स्नॅपड्रॅगनच्या लेटेस्ट प्रोसेसरसह येणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये समाविष्ट होणार आहे. मोटोरोला सिग्नेचर 27 हा आगामी स्मार्टफोन कंपनी प्रीमियम फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये लाँच करणार असल्याचे सांगितलं जात आहे. या ठिकाणी या डिव्हाईसची थेट स्पर्धा सॅमसंग, ॲपल आणि शाओमी सारख्या ब्रँड्सच्या प्रिमियम डिव्हाईससोबत होणार आहे. आगामी मोटोरोला स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी त्याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. (फोटो सौजन्य: X)
Revealing our most advanced smartphone yet at #SnapdragonSummit, motorola signature 27. Here’s what to look forward to:
– Our best camera system yet.
– The only smartphone in the market to feature audio by Bang & Olufsen.
– Unprecedented speeds with @Snapdragon 8 Elite Extreme… pic.twitter.com/hGuz5Z9mmd — motorola (@Moto) September 22, 2026
कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, मोटोरोला सिग्नेचर 27 मध्ये 2nm स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चिपसेट दिला जाणार आहे. हाय-परफॉर्मेंस प्रोसेसरमुळे फोनमध्ये उष्णता कंट्रोल करण्यासाठी कंपनीने नवीन ArcticMesh कूलिंग सिस्टिमचा वापर केला आहे. यामध्ये डायमंड-इन्फ्यूज्ड थर्मल जेल, लिक्विड मेटल, कॉपर मेश आणि 3D वेपर चेंबर देखील मिळणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, फोन हाय-एंड गेमिंग, AI प्रोसेसिंग आणि 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग सारख्या अवघड कामांदरम्यान फोनचे तापमान कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहे. फोनच्या रिअर पॅनलवर कंपनीने ट्रेडिशनल मोठ्या कॅमेरा बंपऐवजी क्लस्टर्ड मल्टी-सेंसर डिझाईन मिळणार आहे.
मोटोरोलाच्या नव्या सिग्नेचर 27 च्या कॅमेरा सेटअपमध्ये मोठे कॅमेरा अपग्रेड देखील पाहायला मिळणार आहे. फोनमध्ये 50MP सोनी लायटिया 910 प्रायमरी कॅमेरा पाहायला मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये 200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील मिळणार आहे. या कॅमेरा सेटअपसह मोटोरोला थेट कॅमेरा-सेंट्रिक प्रीमियम स्मार्टफोन्सना टक्कर देणार आहे.
डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर, सिग्नेचर 27 मध्ये मोटोरोलाच्या सध्याच्या डिझाइन तत्त्वज्ञानात काही बदल दिसून येतात. डिव्हाईसमध्ये टेक्सचर्ड फिनिश पाहायला मिळणार आहे. हा फोन ‘पँटोन कोल स्मोक’ आणि ‘पँटोन कॅप्युलेट ग्रीन’ या रंगपर्यायांमध्ये उपलब्ध असेल.