Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MrBeast ने रचला इतिहास! YouTube वर पार केला 500 मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा… चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

MrBeast YouTube: मिस्टरबीस्ट जगातील पहिला असा इंडिविजुअल क्रिएटर आहे, ज्याने युट्यूबरवर 500 मिलियन (50 करोड) सब्सक्रायबर्सचा मोठा टप्पा पार केला आहे. या विशेष प्रसंगी चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. या खास प्रसंगी मिस्टरबीस्टने त्याच्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह स्ट्रिमिंग देखील केले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 15, 2026 | 10:59 AM
MrBeast ने रचला इतिहास! YouTube वर पार केला 500 मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा... चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

MrBeast ने रचला इतिहास! YouTube वर पार केला 500 मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा... चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Follow Us
Follow Us:
  • मिस्टरबीस्टने 500 मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करत युट्यूबच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • या ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुमारे 13 मिलियन लोकांनी पाहिले आणि चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
  • युट्यूबचे सिईओ नील मोहन यांनी मिस्टरबीस्टला विशेष कस्टम प्ले बटन देत त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
जिमी डोनाल्डसन म्हणजेच MrBeast या नावाने प्रसिद्ध असणाऱ्याने आता एक मोठा इतिहास रचला आहे. मिस्टरबीस्टने त्याच्या युट्यूब चॅनेलवर 500 मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा पार केला आहे. 500 मिलियन म्हणजेच 50 करोड सबस्क्रायबर्सचा आकडा पार करणारा मिस्टरबीस्ट हा जगातील पहिला युट्यूबर बनला आहे.

हा खास क्षण साजरा करण्यासाठी मिस्टरबीस्ट युट्यूब चॅनेलवर लाईव्ह होता आणि वाढत्या सबस्क्रायबर्सच्या संख्येवर लक्ष ठेऊन होता. 500 मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा पूर्ण होताच चाहत्यांनी कमेंटमध्ये कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी मिस्टरबीस्टला युट्यूबकडून एक खास प्ले बटन देखील देण्यात आले.

ना दिवसा, ना रात्री! आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाही वाजणार Emergency Alarm… सरकारने का घेतला हा मोठा निर्णय?

500 मिलीअन सबस्क्रायबर्सचा आकडा केला पार

मिस्टरबीस्टने अनेक कंटेट क्रिएटरचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने एक नवीन विक्रम रचला आहे. युट्यूबवर 500 मिलीअन सबस्क्रायबर्सचा आकडा पूर्ण करणारा जगातील पहिला युट्यूबर अशी नवीन ओळख आता मिस्टरबीस्टने निर्माण केली आहे. 12 जून 2026 रोजी मिस्टरबीस्टने त्याच्या चॅनेलवर स्ट्रिमिंग सुरु केले आणि सबस्क्रायबर्सच्या वाढत्या आकड्यावर त्याने लक्ष ठेवले.

संख्या जसजशी वाढत होती, मिस्टरबिस्ट आणि चाहत्यांचा उत्साह देखील वाढत होता. शेवटच्या काही क्षणात सबस्क्रायबर्सची संख्या अतिशय वेगाने वाढली आणि मिस्टरबीस्टने 500 मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा पार केला. हे लाईव्ह स्ट्रिमिंग सुमारे सुमारे 13 मिलियन लोकांनी पाहिले. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)

युट्यूबने दिले खास प्ले बटन

मिस्टरबीस्टच्या या खास विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी युट्यूबचे सिईओ नील मोहन यांनी मिस्टरबीस्टला एक खास कस्टम प्ले बटन दिले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मिस्टरबीस्टला 500 मिलीअन सबस्क्रायबर्सचा आकडा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि म्हटलं की, 500 मिलीअन सबस्क्रायबर्सचा आकडा पूर्ण करणं हे युट्यूबच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण भाग आहे. तसेच, मिस्टरबीस्टने देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.

नील मोहन यांनी पोस्ट शेअर करत लिहीले आहे की, युट्यूबवरवर 50 कोटी (500 मिलीअन) सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठणारे पहिले ‘क्रिएटर’ ठरून इतिहास घडवल्याबद्दल मिस्टरबीस्ट यांचे अभिनंदन! जेव्हा एखाद्या क्रिएटरला आपल्या कल्पकतेनुसार काम करण्याचे आणि स्वतःचे अस्सल व्यक्तिमत्त्व जपण्याचे स्वातंत्र्य मिळते, तेव्हा काय साध्य होऊ शकते, याचे हे यश म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. जिमी, तू एक विलक्षण इनोव्हेटर व्यक्ती आहेस आणि तुझ्या या प्रवासाचा एक भाग असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.

iPhone यूजर्सची प्रतीक्षा संपणार? WhatsApp वर येणार मेसेज शेड्यूल फीचर, जाणून घ्या सविस्तर

असा आहे मिस्टरबीस्टचा प्रवास

जिमी डोनाल्डस म्हणजेच मिस्टरबीस्टने 2012 मध्ये म्हणजेच सुमारे वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचा यूट्यूब प्रवास सुरु केला होता. सुरुवातीला तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर गेमिंग व्हिडीओ, रिअ‍ॅक्शन व्हिडीओ आणि यूट्यूब ट्रेंड्संबंधित कंटेट पोस्ट करत होता. आज वयाच्या 27 व्या वर्षी तो जगातील सर्वात लोकप्रिय डिजिटल क्रिएटर्सपैकी एक बनला आहे. त्याचे व्हिडिओ मोठ्या रोख बक्षिसांसाठी, अनोख्या आव्हानांसाठी, भव्य स्पर्धांसाठी आणि धर्मादाय प्रकल्पांसाठी ओळखले जातात. कालांतराने, त्याने आपल्या चॅनलला एका मोठ्या मीडिया व्यवसायात रूपांतरित केले आहे, जिथे तो शेकडो लोकांना रोजगार देतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिडिओंची निर्मिती करतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मिस्टरबीस्ट कोण आहे?

    Ans: MrBeast हे जगातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब क्रिएटर्सपैकी एक आहेत. त्यांचे खरे नाव Jimmy Donaldson आहे.

  • Que: मिस्टरबीस्ट कशासाठी प्रसिद्ध आहेत?

    Ans: ते मोठ्या बक्षिसांच्या स्पर्धा, चॅलेंज व्हिडिओ, समाजसेवा आणि भव्य यूट्यूब प्रोजेक्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत.

  • Que: मिस्टरबीस्ट पैसे कसे कमावतात?

    Ans: यूट्यूब जाहिराती, ब्रँड डील्स, व्यवसाय, मर्चेंडाइज आणि इतर डिजिटल उपक्रमांमधून ते कमाई करतात.

Web Title: Mrbeast created history he completed 500 million subscribers on youtube channel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • YouTube
  • YouTube Channel

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.