Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहो काय सांगता, आता चक्क चंद्रावर मिळणार मोबाईल नेटवर्क! HD व्हिडिओ स्ट्रीमिंगही होणार शक्य, काय आहे NASA आणि Nokia चा प्लॅन?

नासा आणि Nokia ने एक नवीन मिशन हाती घेतलं आहे. आतापर्यंत तुम्ही पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात नेटवर्कचा वापर करू शकत होतात. पण आता तुम्हाला हाच नेटवर्क चंद्रावर देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 27, 2025 | 08:48 AM
अहो काय सांगता, आता चक्क चंद्रावर मिळणार मोबाईल नेटवर्क! HD व्हिडिओ स्ट्रीमिंगही होणार शक्य, काय आहे NASA आणि Nokia चा प्लॅन?

अहो काय सांगता, आता चक्क चंद्रावर मिळणार मोबाईल नेटवर्क! HD व्हिडिओ स्ट्रीमिंगही होणार शक्य, काय आहे NASA आणि Nokia चा प्लॅन?

Follow Us
Close
Follow Us:

आता लवकरच नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा) आणि Nokia संशोधनात एक ऐतिहासिक टप्पा गाठणार आहेत. नासा आणि नोकियाने आता एक नवीन मिशन हाती घेतलं असून या दोन्ही कंपन्या आता चंद्रावर मोबाईल नेटवर्क लाँच करण्याच्या तयारीत आहेत. हा अभूतपूर्व विकास इन्ट्युट्यूटिव्ह मशीन्सच्या IM-2 मोहिमेचा एक भाग आहे. या मिशन अंतर्गत गुरुवारी Athena लँडर लाँच केला जाणार आहे, जे लूनर सरफेस कम्युनिकेशन सिस्टम (LSCS) सेटअप करण्यासाठी मदत करेल. Nokia ने विकसित केलेले LSCS, पृथ्वीवर वापरल्या जाणाऱ्या सेल्युलर टेक्नोलॉजीचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर कनेक्टिव्हिटी स्थापित करेल.

Realme चे नवीन स्टायलिश Earbuds लाँच, सिंगल चार्ज देणार 52 तासांची बॅटरी लाईफ; किती आहे किंमत?

हे मोबाइल नेटवर्क लँडर आणि चंद्र यानांमध्ये हाय-डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रीमिंग, कमांड-अँड-कंट्रोल कम्युनिकेशन्स आणि टेलिमेट्री डेटा ट्रान्सफर सक्षम करेल. Nokia Bell Labs Solutions Research चे अध्यक्ष Thierry Klein यांच्या मते, हे नेटवर्क अंतराळातील कठीण परिस्थिती – जसे की एक्सट्रीम टेम्परेचर, रेडिएशन आणि लँडिंग दरम्यान होणारे वाइब्रेशन्स या सर्वस्यांना तोंड देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Thierry Klein यांनी MIT Technology Review ला सांगितलं आहे की, “आम्ही सर्व कंपोनेंट्स ‘नेटवर्क इन अ बॉक्स’ मध्ये ठेवले आहेत, ज्यामध्ये अँटेना आणि पॉवर सोर्स वगळता सेल नेटवर्कसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.”

या मोहिमेत दोन चंद्रयानांचा समावेश असेल: Intuitive Machines चे Micro-Nova Hopper आणि Lunar Outpost चे मोबाइल ऑटोनॉमस प्रॉस्पेक्टिंग प्लेटफॉर्म (MAPP) रोवर. ही वाहने नोकियाच्या डिव्हाइस मॉड्यूल्सचा वापर करून Athena लँडरने स्थापित केलेल्या नेटवर्कशी जोडली जातील. चंद्र रात्रीमुळे हे नेटवर्क फक्त काही दिवस काम करेल, परंतु भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते, अशी आशा आहे.

या मोबाईल नेटवर्कच्या यशामुळे NASA च्या Artemis कार्यक्रमाचा पाया रचला गेला आहे, ज्याचा उद्देश 2027 पर्यंत मानवांना चंद्राच्या पृष्ठभागावर परत आणणे आहे. चंद्रावरील सस्टेनेबल ह्यूमन अ‍ॅक्टिव्हिटीना समर्थन देण्यासाठी या नेटवर्कचा विस्तार करणे हे नोकियाचे ध्येय आहे, ज्यामध्ये भविष्यातील अंतराळवीरांसाठी स्पेससूटमध्ये सेल कम्युनिकेशन्स एकत्रित करणे समाविष्ट असू शकते.

Klein ने म्हटलं आहे की, “कदाचित ‘बॉक्समधील नेटवर्क’ किंवा एकच टॉवर पूर्ण कव्हरेज देऊ शकेल, किंवा आपल्याला त्यापैकी अनेकांची आवश्यकता असू शकते.” या नेटवर्कचा विस्तार लूनर इकोनॉमी आणि परमानेंट हेबिटेट्सच्या विकासाला चालना देणार आहे.

चंद्रावर मोबाईल नेटवर्क तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान विशेषतः अवकाशातील अत्यंत कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. Nokia च्या इंजीनियर्सने असे कंपोनेंट्स तयार केले आहेत, जे रेडिएशन, एक्सट्रीम टेम्परेचर फ्लक्चुएशन्स आणि स्पेस ट्रैवलदरम्यान होणाऱ्या वाइब्रेशन्सना तोंड देऊ शकतात.

Poco M7 5G ची लाँच डेट कन्फर्म, फ्लिपकार्टवर स्पेसिफिकेशनचा खुलासा! 10 हजारांहून कमी असेल स्मार्टफोनची किंमत

दीर्घकालीन वापरासाठी नियामक आव्हानांना तोंड देणे आवश्यक आहे हे मान्य करून, क्लेन म्हणाले, “परमनेंट डिप्लॉयमेंटसाठी, आपल्याला वेगळा फ्रिक्वेन्सी बँड निवडावा लागेल,”. हे नेटवर्क पृथ्वीवरील 4G आणि 5G स्टँडर्ड्ससोबत सुसंगत असेल.

PRIME-1 एक्सपेरिमेंट

मोबाइल नेटवर्क डिप्लॉयमेंट व्यतिरिक्त, NASA त्यांचा Polar Resources Ice Mining Experiment 1 (PRIME-1) देखील आयोजित करेल. या प्रयोगात चंद्राच्या पृष्ठभागावर ड्रिल केले जाईल, रेगोलिथ काढले जाईल आणि मास स्पेक्ट्रोमीटरने वोलेटाइल्सचे विश्लेषण केले जाईल.

Web Title: Nasa and nokia are planning to launch mobile network on moon which help for hd video streaming also tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • Mobile Network
  • NASA
  • Tech News

संबंधित बातम्या

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
1

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
2

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
3

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी
4

BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.