Realme चे नवीन स्टायलिश Earbuds लाँच, सिंगल चार्ज देणार 52 तासांची बॅटरी लाईफ; किती आहे किंमत?
टेक कंपनी Realme ने त्यांचे नवीन स्टायलिश इअरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने मंगळवारी चीनमध्ये TWS ईयरफोन्स Realme Buds Air 7 या नावाने लाँच केले आहे. कंपनीने मंगळवारी त्यांचे दोन ब्रँड न्यू स्मार्टफोन Realme Neo 7 SE आणि Neo 7x चीनमध्ये लाँच केले आहेत. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने त्यांचे नवीन इअरबड्स देखील लाँच केले आहेत.
Realme ने नवीन इअरबड्समध्ये 52dB पर्यंत एक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) सपोर्ट दिला आहे. यामध्ये Hi-Res Audio सर्टिफिकेशन आणि हाई-फिडेलिटी लॉसलेस LHDC 5.0 ऑडियो कोडेक सपोर्ट देखील आहे. कंपनीने दावा केला आहे की चार्जिंग केससह हे इअरबड्स 52 तासांचा प्लेटाईम ऑफर करतात. Realme ने मे 2024 मध्ये भारतात Realme Buds Air 6 TWS इअरबड्स लाँच केले होते. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा त्यांचे नवीन इअरबड्स लाँच केले आहे. या नवीन इअरबड्सचा लूक अतिशय कमाल आहे. त्यांची स्टाईल तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स देते. (फोटो सौजन्य – X)
चीनमध्ये Realme Buds Air 7 ची किंमत CNY 299 म्हणजेच अंदाजे 3,600 रुपये आहे. या इअरबड्ससाठी रियलमी चायना ई-स्टोअरवर प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. त्यांची विक्री चीनमध्ये 26 फेब्रुवारी रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 7:30 वाजता) सुरू झाली आहे. हे इअरबड्स डॉन गोल्ड, ऑर्किड पर्पल आणि व्हर्डंट ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी एअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.
Realme Buds Air 7 मध्ये 12.4mm टायटॅनियम-प्लेटेड डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, जे N52 निओडीमियम मॅग्नेट आणि कॉपर SHTW कॉइलसह येतात. ते 3D स्पेशियल ऑडिओ अनुभव आणि 52dB पर्यंत ANC ला समर्थन देतात, ज्यामध्ये AI-समर्थित अॅडॉप्टिव्ह ANC समाविष्ट आहे. यात सहा माइक सिस्टम आहे, जी कॉल दरम्यान आवाज कमी करण्यास मदत करतात.
Realme Buds Air 7 मध्ये Bluetooth 5.4, स्विफ्ट पेयर आणि डुअल डिवाइस कनेक्टिविटी सपोर्ट देण्यात आला आहे. ते Hi-Res Audio सर्टिफाइड आहेत आणि LHDC 5.0, SBC आणि AAC ऑडिओ कोडेक्सना समर्थन देतात. 45ms पर्यंत लो लेटेंसी आहे, जो ऑडियो-विजुअल लॅग कमी करण्यासाठी मदत करते. हे टच कंट्रोल्ससह येतात आणि Realme Link अॅपशी सुसंगत आहेत. हे इयरफोन (केस नाही) धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधक आहेत आणि त्यांना IP55 रेटिंग आहे.
Boat Smartwatch: प्रीमियम लुक आणि जबरदस्त फीचर्ससह Boat स्मार्टवॉच लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये
बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाले तर, Realme Buds Air 7 चार्जिंग केससह ANC शिवाय 52 तासांपर्यंत टिकू शकते. ANC चालू असताना, ते 30 तासांपर्यंत वापरले जाऊ शकतात. फक्त इअरबड्स ANC शिवाय 13 तास आणि ANC सह 7.5 तास टिकतात. कंपनीचा दावा आहे की 10 मिनिटांच्या जलद चार्जिंगसह इअरबड्सचा 10 तासांपर्यंत वापर केला जाऊ शकतो. प्रत्येक इअरबडमध्ये 62mAh बॅटरी आहे, तर USB टाइप-सी पोर्टसह चार्जिंग केसमध्ये 480mAh बॅटरी आहे.