Poco M7 5G ची लाँच डेट कन्फर्म, फ्लिपकार्टवर स्पेसिफिकेशनचा खुलासा! 10 हजारांहून कमी असेल स्मार्टफोनची किंमत
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Poco लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनचा टिझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्याच्या लाँच डेट आणि काही स्पेसिफेकशन्सबद्दल खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व युजर्सना Poco च्या आगामी स्मार्टफोनबद्दल प्रचंड उत्सुकता लागली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आगामी स्मार्टफोन Poco M7 5G या नावाने भारतात लाँच केला जाणार आहे. स्मार्टफोनच्या लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Poco M7 5G भारतात 3 मार्च रोजी लाँच होणार आहे. कंपनीने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट शेअर करत या नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे. Poco M7 5G हा स्मार्टफोन भारतात Poco M6 चा उत्तराधिकारी म्हणून 3 मार्च रोजी लाँच होईल. फ्लिपकार्टवर त्याचे लँडिंग पेज लाईव्ह झाल्यानंतर फोनची रचना आणि प्रमुख वैशिष्ट्ये उघड झाली आहेत. या डिव्हाइसची किंमत आणि सेगमेंट लाँचिंगपूर्वीच निश्चित करण्यात आले आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली रेंजमध्ये असल्याची पुष्टी झाली आहे.
Blockbuster feels. Award-winning performance.
It’s time for #TheBigShow 💪#POCOM75G 🤩💜Launching on 3rd March on #Flipkart
Know More: https://t.co/7zDmIgSjCy pic.twitter.com/EOLJe1k2WK
— POCO India (@IndiaPOCO) February 25, 2025
No lags. No glitches. Just seamless connectivity.#POCOM75G #TheBigShow. 📶
Launching on 3rd March on #Flipkart
Know More: https://t.co/7zDmIgRLN0@Snapdragon_IN pic.twitter.com/0Fuik9NcQg
— POCO India (@IndiaPOCO) February 26, 2025
Poco M7 5G मध्ये वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल दिले जाऊ शकते, तर M7 Pro मध्ये चौकोनी कॅमेरा मॉड्यूल देण्यात आलं आहे. कंपनीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्मार्टफोनची एक झलक दाखवण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. याशिवाय, फोनमध्ये पंच-होल डिझाइनसह फ्लॅट डिस्प्ले आणि सिम स्लॉट, मायक्रोफोन, यूएसबी-सी पोर्ट आणि खाली स्पीकर असेल. यासोबतच, डिव्हाइसमध्ये साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देखील असेल.
Poco ने पुष्टी केली आहे की Poco M7 5G ची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल, ज्यामुळे तो भारतातील सर्वात परवडणाऱ्या 5G स्मार्टफोनपैकी एक बनेल.
Poco M7 5G मध्ये 6.88-इंचाचा एलसीडी पॅनेल असेल, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 600 निट्स पीक ब्राइटनेस देईल. हे डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेटसह 6 जीबी रॅम आणि अतिरिक्त 6 जीबी व्हर्च्युअल रॅमसह सुसज्ज असेल.
Poco M7 5G हे Redmi 14C 5G चे रिब्रँडेड व्हर्जन असल्याचे मानले जाते, कारण दोन्हीमध्ये समान वैशिष्ट्ये आहेत. M7 हा स्मार्टफोन अलीकडेच गुगल प्ले कन्सोल डेटाबेसमध्ये 24108PCE21 या मॉडेल क्रमांकासह दिसला, ज्यामध्ये 720 x 1640 पिक्सेलचा एचडी+ रिझोल्यूशन आणि 4 जीबी रॅम असेल. M7 मध्ये 8MP सेल्फी कॅमेरा, 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 18W चार्जिंगसह 5,160mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.