
Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! जाणून घ्या अधिक
फ्री फायर मॅक्समध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील 7 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये स्पिन करून प्लेअर्सना 67 ईमोट फ्री मिळवण्याची संधी मिळणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये बक्षीसे जिंकण्यासाठी प्लेअर्सना त्यांचं नशीब आजमावे लागणार आहे आणि स्पिन करावे लागणार आहे. प्रत्येक स्पिननंतर प्लेअर्सना एक वेगळा रिवॉर्ड फ्री मिळणार आहे. लक्षात ठेवा की स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड खर्च करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फेडेड व्हिल ईव्हेंटमध्ये 1 स्पिनची किंमत 9 डायमंड्स आहे. तर दुसऱ्या स्पिनची किंमत 19 डायमंड्स आहे. तिसऱ्या स्पिनची किंमत 39 डायमंड्स आणि चौथ्या स्पिनची किंमत 69 डायमंड्स आहे. पाचव्या स्पिनची किंमत 99 डायमंड्स आहे. तर सहाव्या स्पिनची किंमत 149 डायमंड्स आणि सातव्या स्पिनची किंमत 199 डायमंड्स आहे. आठव्या स्पिनची किंमत 499 डायमंड्स आहे.