Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान
मिळालेल्या माहितीनुसार, मेटाचे दोन्ही आगामी प्रोग्राम वेगवेगळ्या डोमेनवर काम करणार आहेत. याशिवाय या दोन्ही आगामी मॉडेल्सबाबत काही माहिती देखील समोर आली आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Mango: हे मॉडेल हाय-क्वालिटी इमेज आणि व्हिडीओ जनरेशनवर फोकस करणार आहे. मेटाच्या या AI मॉडेलचा उद्देश ओपनएआयचे सोरा आणि गुगलचे जेमिनी 3 फ्लॅश यासारख्या टूल्सना मागे टाकून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करणं असं आहे. ओपनएआयचे सोरा आणि गुगलचे जेमिनी 3 फ्लॅश सध्या क्रिएटिव फील्डमध्ये आघाडीवर आहेत.
Avocado (कोडिंग आणि रीजनिंगसाठी): हे मेटाचे आतापर्यंतचे सर्वात स्मार्ट लार्ज लँग्वेज मॉडेल असणार आहे. Avocado समोर मेटाचा सध्या उपलब्ध असलेला Llama मॉडेल देखील कोडिंगमध्ये मागे पडणार आहे. आगामी AI मॉडेल Avocado डीप टेक्निकल प्रॉब्लम सॉल्विंग आणि कोडिंगसाठी एका विशेष पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे.
Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर
या संपूर्ण प्रोजक्टची जबाबदारी मेटाच्या नवीन चीफ AI ऑफिसर अलेक्झांडर वांग यांना देण्यात आली आहे. 28 वर्षीय वांग स्केल AI चे फाऊंडर होते. ते याचवर्षी मेटामध्ये सहभागी झाले आहेत. मेटाने त्यांची नवीन डिवीजन मेटा सुपरइंटेलिजेंस लॅब्स (MSL) तयार केली आहे. वांग ने त्यांच्या टीममध्ये ओपनएआयमधील 20 हून अधिक शास्त्रज्ञांना सहभागी केले आहे. यामुळे वांग यांच्या टीमला सुपर टीम म्हटलं जात आहे. वांग यांचा असा उद्देश आहे की, त्यांनी तयार केलेले मॉडेल्स केवळ शब्दच नाही तर संपूर्ण जगाला समजून घेतील. त्यामुळे AI च्या जगातील एक वेगळी क्रांती मानली जात आहे.
गुगल आणि ओपनएआय देखील AI च्या शर्यतीमधील आघाडीवर असलेले स्पर्धक आहेत. मात्र गेल्या काहि महिन्यांपासून स्पर्धा प्रचंड वाढली आहे. गुगलच्या जेमिनी मॉडेल्सचे यूजर बेस संख्या प्रचंड वाढसली आहे. ऑक्टोबरपर्यंत ही संख्या 650 मिलियन होती. ओपनएआय देखील या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे.
Ans: Meta कंपनीने विकसित केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म.
Ans: व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरमध्ये.
Ans: चॅट, माहिती शोध, कंटेंट तयार करणे आणि AI टूल्ससाठी.






