Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर

Smartphone Charging Tips: स्मार्टफोनच्या चार्जिंगबाबत यूजर्सच्या मनात नेहमीच शंका असते. कारण नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला कितीवेळ चार्ज करावा हे अनेकांना माहिती नसतं. याचबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2026 | 10:59 AM
Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर

Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • पूर्वीच्या काळी नवा स्मार्टफोन 8 ते 10 तास चार्ज करण्याचा सल्ला दिला जात होता
  • काळानुसार स्मार्टफोन वापरण्याची आणि चार्ज करण्याची पद्धत बदलली
  • फोन अधूनमधून जवळपास 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करणे आवश्यक असते
Smartphone Tips: ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर सध्या सेल आणि ऑफर्स सुरु आहेत. या ऑफर्सअंतर्गत कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी ऑफर्स आणि डिस्काऊंटसह नवीन स्मार्टफोन खरेदी केला आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर अनेक यूजर्सच्या मनात एक प्रश्न असतो. हा प्रश्न म्हणजेच पहिल्यांदाच स्मार्टफोन किती वेळ आणि किती टक्के चार्ज करावा. कारण पूर्वीच्या काळात स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच 8 ते 10 तास चार्ज करण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र आता असं करण्याची गरज नाही.

कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

8 ते 10 तास स्मार्टफोन चार्ज करण्याची आवश्यकता नाही

काळानुसार स्मार्टफोन अपग्रेड झाले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन वापरण्याची आणि चार्ज करण्याची पद्धत देखील बदलली आहे. याच कारणामुळे जेव्हा आता तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करता, तेव्हा पहिल्यांदाच 8 ते 10 तास चार्ज करण्याची आवश्यकता नाही. दुसरे कारण म्हणजेच लेटेस्ट आणि ॲडव्हांस स्मार्टफोन्स लिथियम-आयन किंवा लिथियम-पॉलिमर बॅटरीने सुसज्ज असतात. असे स्मार्टफोन्स पहिल्यांदाच दिर्घकाळ चार्ज करण्याची आवश्यकता नसते.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

स्मार्टफोन पहिल्यांदा किती वेळ चार्ज करावा?

नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तुम्ही त्याला सामान्य पद्धतीने चार्ज करू शकतात. तुम्ही खरेदी केलेल्या स्मार्टफोनची बॅटरी जर 20-30 टक्के असेल, तर तुम्ही हा स्मार्टफोन घरी घेऊन आल्यानंतर कंपनीच्या ओरिजिनल किंवा सर्टिफाइड चार्जरने चार्ज करू शकता. स्मार्टफोनची चार्जिंग 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर चार्जर हटवू शकता. पण लक्षात ठेवा की, स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला 8, 10 किंवा 12 तास चार्ज करण्याची गरज नाही.

जर नवा स्मार्टफोन आधीपासून 40 ते 60 टक्के चार्ज असेल तर त्याला लगेच 100 टक्के चार्ज करण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही तुमच्या गरजेनुसार स्मार्टफोनचा वापर करून नंतर त्याला चार्ज करू शकता.

महागाईच्या काळातही iPhone ने मारली बाजी! या डिव्हाईसची झाली सर्वाधिक विक्री, काय आहे कारण? जाणून घ्या

पहिल्यांदाच 100 टक्के चार्ज करावा स्मार्टफोन?

अनेकजण असा सल्ला देतात की, स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला 100 टक्के चार्ज करावा. पण खरंच असं आहे का? असे म्हटले जाते की बॅटरीच्या टक्केवारीची माहिती सिस्टमशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यासाठी (सिंक करण्यासाठी) फोन अधूनमधून जवळपास 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करणे आवश्यक असते. त्यामुळे अनेकजण स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करतात. याचा अर्थ असा नाही की, फोन दररोज 100 टक्के चार्ज करणं गरजेचं आहे.

Web Title: New smartphone charging tips should you charge your new phone 100 percent what is the truth hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Second Hand iPhone: सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, खरेदीपूर्वी असा तपासा वॉरंटी स्टेटस
1

Second Hand iPhone: सेकंड हँड किंवा रिफर्बिशड आयफोन खरेदी करण्याचा प्लॅन करताय? थांबा, खरेदीपूर्वी असा तपासा वॉरंटी स्टेटस

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
2

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
3

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
4

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.