कमी किंमतीत तगडे फीचर्स! Realme ने भारतात गुपचूप लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
टेक कंपनीने अधिकृतपणे या स्मार्टफोनचे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये 4GB+64GB आणि 4GB+128GB यांचा समावेश आहे. या डिव्हाईसच्या 4GB+64GB व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये आणि 4GB+128GB व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन नेबुला ब्लॅक आणि मूनलाइट सिल्व्हर या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Realme)
भारतात लाँच करण्यात आलेल्या रिअलमी स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.75-इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या एचडी प्लस डिस्प्लेचे रेजोल्यूशन 1570 x 720 पिक्सेल आहे. रिअलमीच्या या स्मार्टफोनची मॅक्सिमम ब्राईटनेस 900 निट्स आहे. डिस्प्लेचा मॅक्सिमम टच सँपलिंग रेट 240Hz आणि Viviv मोडमध्ये कलर गॅमट 86% DCI-P3 आहे. फोनमध्ये कंपनीने Panda MN228 प्रोटेक्टिव ग्लासचा वापर केला आहे.
कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन युनिसॉक टी7250-प्रोसेसर, 4GB की एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटचा वापर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईडवर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस रिअलमी यूआयवर चालतो.
रिअलमी पी4 एस लाईट 4G स्मार्टफोनमध्ये 15W चार्जिंग आणि 15W यूएसबी पॉवर डिलिव्हरी (रिवर्स चार्जिंग) सपोर्टसह 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचे वजन सुमारे 215 ग्रॅम आहे. फोनच्या बाजूला साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो ऑटोफोकसला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनचा रिअर कॅमेरा 30fps वर 1080p व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये वायफाय 5, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5G आणि एनएफसीचा सपोर्ट नाही दिला आहे.






