Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple iPhone Update: Apple च्या फोल्डेबल iPhone बाबत समोर आली मोठी अपडेट, अशी असू शकते हटके डिझाईन

Apple ने अद्याप त्यांच्या फोल्डेबल आयफोनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, अ‍ॅपलच्या फोल्डेबल आयफोन डिव्हाइसमध्ये युजर्सना आयफोन आणि आयपॅड दोन्हीचे फीचर्स दिले जाणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2025 | 08:50 AM
Apple iPhone Update: Apple च्या फोल्डेबल iPhone बाबत समोर आली मोठी अपडेट, अशी असू शकते हटके डिझाईन

Apple iPhone Update: Apple च्या फोल्डेबल iPhone बाबत समोर आली मोठी अपडेट, अशी असू शकते हटके डिझाईन

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Apple त्यांच्या पहिल्या फोल्डेबल iPhone वर काम करत आहे, असे अनेक अहवाल गेल्या काही दिवसांपासून समोर आले आहेत. Apple चा हा आगामी iPhone सॅमसंग, ओप्पो आणि हुआवेईसारख्या कंपन्यांनी लाँच केलेल्या स्मार्टफोनशी स्पर्धा करणार आहे. आता Apple च्या या आगामी iPhone बाबत नवीन आणि मोठी अपडेट समोर आली आहे. iPhone चे डिझाईन कसे असेल याबाबत एका टिपस्टरने माहिती दिली आहे.

अँड्रॉइडवरील Amazon चं अ‍ॅप स्टोअर होणार बंद, कंपनीने का घेतला हा निर्णय? जाणून घ्या कारण

टिपस्टरने Apple च्या फोल्डेबल आयफोनच्या आतील आणि बाहेरील डिस्प्लेचे तपशील लीक केले आहेत. iPhone ‘अनप्रसीडेंटेड’ स्क्रीन रेशिओसह बुक-स्टाइल फोल्डेबल मॉडेल म्हणून लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने अद्याप फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीला अशा डिव्हाइसमध्ये वापरता येणाऱ्या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळाले आहे. टिपस्टरने फोल्डेबल iPhone बाबत माहिती देण्यासाठी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अ‍ॅपलच्या फोल्डेबल आयफोनमध्ये 5.49 इंचाचा कव्हर डिस्प्ले असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. Weibo वरील एका पोस्टमध्ये, टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनमध्ये असा दावा केला आहे की Apple चा बुक-स्टाइल फोल्डेबल Oppo Find N सिरीजसारखा असेल. त्याचे बिल्ड लहान आणि मजबूत असेल. असं सांगितलं जात आहे की Apple त्यांच्या फोल्डिंग फोनमध्ये 5.49-इंचाचा कव्हर डिस्प्ले देईल, जो OPPO च्या पहिल्या पिढीतील फाइंड N हँडसेटच्या आउटर स्क्रीन आकाराचा असेल.

टिपस्टर म्हणतो की, आतील बाजूस, फोल्डेबल आयफोनमध्ये 7.74 -इंच स्क्रीन असेल. टिपस्टरने म्हटले आहे की मोठा डिस्प्ले आयपॅडसारखा ओपन होईल. या फोल्डेबल फोनमध्ये ‘अनप्रसीडेंटेड स्क्रीन रेशिओ किंवा आस्पेक्ट रेशिओ’ असल्याचेही म्हटले जाते. डिजिटल चॅट स्टेशनच्या मते, Apple चर्चेत असलेला फोल्डेबल फोन स्मार्टफोन आणि टॅबलेट फंक्शनलिटी प्रदान करणारा एक डिव्हाइस म्हणून लाँच केला जाऊ शकतो. जर Apple ने असा हँडसेट लाँच केला तर तो ओप्पोच्या फाइंड N सिरीज, सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड फोल्ड लाइनअपसारख्या इतर बुक-स्टाईल फोल्डेबलशी स्पर्धा करेल.

हरवलेल्या वस्तू शोधणं झालं आणखी सोपं, भारतात लाँच झाला boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर; केवळ इतकी आहे किंमत

2026 मध्ये आगामी डिव्हाइस लाँच होण्याची शक्यता

या महिन्याच्या सुरुवातीला, दुसऱ्या टिपस्टरने सुचवले की Apple चा पहिला फोल्डेबल फोन पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये लाँच होऊ शकतो, तर फोल्डेबल आयपॅड आणि मॅकबुक 2027 मध्ये लाँच केले जाऊ शकते. दरम्यान, अलिकडच्या एका अहवालात असे म्हटले आहे की Apple ने आगामी फोल्डेबल डिव्हाइससाठी एक अल्ट्रा-थिन ग्लास सप्लायर सिक्योर केला आहे.

दुसरीकडे, ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी यापूर्वी दावा केला होता की कंपनी आयपॅडसारख्या फोल्डेबल iPhone वर काम करत आहे ज्यामध्ये विजिबल क्रीज नसेल. रिपोर्टरच्या मते, हे डेव्हिस 2028 मध्ये लाँच केले जाऊ शकते. Apple ने अद्याप फोल्डेबल डिव्हाइस लाँच करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Web Title: New update about upcoming apple foldable iphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.