हरवलेल्या वस्तू शोधणं झालं आणखी सोपं, भारतात लाँच झाला boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर; केवळ इतकी आहे किंमत
इंडियन इलेक्ट्रॉनिक कंपनी boAt त्यांच्या स्मार्टवॉच आणि हेडफोन डिव्हाईससाठी ओळखली जाते. मात्र आता कंपनीने एक नवीन प्रोडक्ट लाँच केलं आहे. boAt ने भारतात boAt TAG लाँच केला आहे. नवीन boAt TAG लाँच करून boAt ने त्यांच्या स्मार्ट डिव्हाइस लाइन-अपचा विस्तार केला आहे. हा ट्र्रॅकर बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच करण्यात आला आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
भारत सरकारची मोठी कारवाई, गुगल प्ले स्टोअरवरून हटवले 100 हून अधिक परदेशी अॅप्स; जाणून घ्या कारण
आपल्या आजूबाजूला अनेक विसरभोळे लोकं असतात. काहीजण त्यांचं वॉलेट विसरतात तर काहीजण त्यांच्या गाडीची चावी. आपण एखादी वस्तू कुठे ठेवली आहे, हे आपल्या लक्षातच राहत नाही. आणि मग ही वस्तू शोधण्यासाठी आपण संपूर्ण घर डोक्यावर घेतो. पण आता हे सर्व करण्याची गरज नाही. कारण आता तुमच्या हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही तुमच्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत, तुमच्यापासून किती अंतरावर आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर देणार आहे. (फोटो सौजन्य – X)
बजेट फ्रेंडली किंमतीत boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर भारतात लाँच करण्यात आला आहे. हा Android युजर्ससाठी डिझाइन केलेला BLE ट्रॅकर आहे. हे डिव्हाईस गुगलच्या फाइंड माय डिव्हाइस नेटवर्कचा वापर करून चाव्या, पाकीट, सामान आणि हँडबॅग्ज यासारख्या हरवलेल्या वस्तू शोधण्यास मदत करते. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वस्तू शोधण्यासाठी संपूर्ण घर डोक्यावर घेण्याची गरज पडत नाही.
कंपनीने सांगितलं आहे केले की, boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर तुमच्या सामानाचे निरीक्षण करण्यासाठी सेमी-रिअल-टाइम ग्लोबल लोकेशन ट्रॅकिंग ऑफर करेल. युजर्सना वस्तू शोधण्यात मदत करण्यासाठी boAt TAG मध्ये 80dB अलार्म आहे, तो फक्त 10 मीटर पर्यंतच्या ब्लूटूथ रेंजमध्ये काम करतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकरमध्ये अनधिकृत ट्रॅकिंग रोखण्यासाठी गोपनीयता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी अज्ञात ट्रॅकर अलर्ट देखील समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, हे डिव्हाईस 1 वर्षाचे बॅटरी लाइफ देते आणि पॅकेजमध्ये एक अतिरिक्त बॅटरी युनिट देखील आहे.
लाँच ऑफर म्हणून, boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर 1,299 रुपयांच्या किमतीत विकले जाईल. boAt TAG काळ्या रंगात उपलब्ध आहे. हे 1 वर्षाच्या वॉरंटीसह उपलब्ध असेल. ग्राहक 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता Flipkart.com आणि boat-lifestyle.com वरून boAt TAG ब्लूटूथ ट्रॅकर खरेदी करू शकतील.