
Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा
टेक जायंट कंपनी Apple आणि टिम कूक यांचं नातं वर्षानुवर्षे एकमेकांसोबत जोडलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टिम कूक Apple चे नेतृत्व करत आहेत. टिम कूक यांच्या नेतृत्वाखाली Apple मध्ये अनेक बदल करण्यात आले आणि निश्चितच यामुळे कंपनीची प्रगती झाली आहे. मात्र आता समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, टिम कूक पुढील वर्षी त्यांचे सिईओ पद सोडण्याची शक्यता आहे. यासंबंधित कंपनीची तयारी देखील सुरु झाली आहे.
आता चक्क AI ठरवणार कर्मचाऱ्यांचं अप्रेजल! Meta ने जारी केला अजब गजब नियम, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
1 नोव्हेंबर रोजी टिम कूक यांचा 65 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. 2011 मध्ये टिम कूक यांनी स्टीव जॉब्स यांची जागा घेत कंपनीचा कारभार हाती घेतला. टिम कूक यांच्या नेतृत्वात कंपनीने अनेक नवीन प्रोड्क्ट्सची निर्मिती केली आणि हे प्रोडक्ट्स बाजारात आल्यानंतर कंपनीने वॅल्यूएशनच्या बाबतीत 4 ट्रिलियन डॉलरचा आकडा देखील पार केला आहे. मात्र आता टिम कूक यांचा Apple मधील हा प्रवास थांबणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, Apple ने टिम कूक यांच्या उत्तराधिकाऱ्याला कंपनीचे नेतृत्व सोपवण्याची तयारी सुरु केली आहे. ही प्रक्रिया कोणत्याही वादाशिवाय पूर्ण व्हावी, अशी कंपनी बोर्डाची इच्छा आहे. कंपनीच्या स्टॉक आणि कामकाजावर नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी अंतर्गत बैठका सुरू झाल्या आहेत. Apple जानेवारीमध्ये आपल्या नवीन सीईओची घोषणा करण्याची अपेक्षा आहे.
हार्डवेयर इंजीनियरिंगचे वाइस प्रेसिडेंट जॉन टर्नस यांना कंपनीच्या नेतृत्वाची जबाबदारी देत कंपनीचे नवीन सिईओ म्हणून त्यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. टर्नस गेल्या 24 वर्षांपासून Apple मध्ये काम करत आहेत आणि ते कंपनीच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये देखील सहभागी असतात. आयफोनपासून आयपॅड आणि मॅकबुकपासून Apple सिलिकॉनपर्यंत, Apple चे प्रत्येक प्रोडक्ट टर्नस किंवा त्यांच्या टिमच्या नजरेखालून जाते. याशिवाय टर्नस यांचे वय देखील याबाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आहे. टर्नस यांचे वय 50 वर्षे आहे. Apple चे इतर वरिष्ठ अधिकारी एकतर खूपच तरुण आहेत किंवा निवृत्तीचे वय गाठण्याच्या जवळ आहेत. त्यामुळे, टर्नर सुमारे एक दशकापर्यंत अध्यक्षपदावर राहू शकतात.
Apple 9 सप्टेंबर रोजी आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमधील आईफोन एयर टर्नसने सादर केला होता. एवढंच नाही, आयफोन 17 सिरीजच्या लाँचिंग दरम्यान ते लंडनमधील रीजेंट स्ट्रीट स्टोअरमध्ये उपस्थित होते आणि आयफोन खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची देखील त्यांनी भेट घेतली. कंपनीमध्ये त्यांची चांगली प्रतिष्ठा आहे आणि टिम कुकचाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
Ans: टिम कुक हे Apple Inc. चे CEO आहेत आणि जगातील सर्वात प्रभावशाली टेक लीडर्सपैकी एक मानले जातात.
Ans: टिम कुक यांनी 2011 मध्ये स्टीव्ह जॉब्सनंतर CEO पदाची जबाबदारी स्वीकारली.
Ans: Apple मध्ये येण्यापूर्वी ते IBM आणि Compaq मध्ये उच्च पदांवर कार्यरत होते.