आता चक्क AI ठरवणार कर्मचाऱ्यांचं अप्रेजल! Meta ने जारी केला अजब गजब नियम, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
मिळालेल्या माहितीनुसार, आता मेटा त्यांचे कर्मचारी AI चा किती वापर करतात, या आधारावर त्यांची वेतनवाढ ठरवली जाणार आहे. जर एखादा कर्मचारी AI चा वापर करत नाही, असे कंपनीला आढळले तर त्यांची वेतनवाढ केली जाणार नाही. याच निर्णयामुळे आता कंपनी त्यांचा इवेल्यूशन प्रोग्राम देखील बदलणार आहे. केवळ मेटाच नाही तर इतर अनेक कंपन्यांनी देखील हा निर्णय आधीच घेतला आहे. त्यामुळे आता अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना AI वापर करणं बंधकारक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मेटाने सांगितलं आहे की, हा नियम पुढील वर्षी लागू केला जाणार आहे. म्हणजेच कंपनी यावर्षी वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचा AI वापर पाहणार नाही. मात्र पुढील वर्षीपासून यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. कंपनी त्यांच्या वर्कप्लेस कल्चरमध्ये AI इंटीग्रेट करण्यासोबतच कर्मचाऱ्यांना AI चा वापर करण्यासाठी प्रोत्साहित देखील करणार आहे. कंपनीची अशी इच्छा आहे की, कर्मचाऱ्यांनी चांगल्या रिझल्टसाठी AI चा जास्तीत जास्त वापर करावा. मेटामधील हेड ऑफ पीपल जेनेल गाले यांनी सांगितलं आहे की, जे कर्मचारी AI चा चांगला आणि जास्तीत जास्त वापर करणार आहेत, त्यांना रिवॉर्ड दिले जाणार आहेत.
मेटाने हायरिंगपासून इतर अनेक कामांमध्ये आधीपासूनच AI टूल्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आता कोडिंग इंटरव्यू देणारे कँडिडेट देखील AI चा वापर करू शकणार आहेत. याशिवाय मेटा लवकरच नवीन AI परफॉर्मेंस असिस्टेंट देखील घेऊन येणार आहे, जे कर्मचाऱ्यांना रिव्ह्यु आणि फिडबॅकसाठी मदत करणार आहे. त्याच्या मदतीने, कर्मचारी त्यांच्या कामात AI वापरून चांगले परिणाम देऊ शकतात हे सांगू शकतील.
मेटासह इतर अनेक कंपन्या AI चा वापर करणाऱ्यावर भर देत आहेत. मेटाप्रमाणेच गूगल, माइक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन देखील कर्मचाऱ्यांना रोजची काम पूर्ण करण्यासाठी AI चा वापर करण्यास सांगत आहेत.
Ans: Facebook, Instagram, WhatsApp, Messenger आणि Threads सारखी अॅप्स
Ans: Settings → Security → 2FA → SMS / Authentication App द्वारे सक्रिय करता येते.
Ans: Meta Verified हा पेड सब्स्क्रिप्शन आहे ज्यात व्हेरिफाइड बॅज, अतिरिक्त सुरक्षा फीचर्स आणि प्रायोरिटी सपोर्ट मिळतो.






