
Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स
चॅटजीपीटी आणि गूगल जेमिनी सारख्या AI चॅटबोट्समध्ये हल्ली लाईव्ह कॅमेरा शेअरिंग सपोर्ट दिला जातो. यामध्ये यूजर्स कॅमेरा फीडच्या मदतीने एआय चॅटबॉटला व्हिज्युअल संदर्भ देऊ शकतात, जेणेकरून ते चांगले प्रतिसाद देऊ शकेल. उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादा ड्रेस आवडला असेल आणि हा ड्रेस तुम्हासा कसा दिसेल याबाबत तुम्ही गोंधळले असाल तर तुम्ही कॅमेरा चालू करून एआई चॅटबॉटला याबाबत विचारू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
कॅमेऱ्याचा वापर करून तुम्ही टेक्स्ट ट्रांसलेशन देखील करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या देशात गेलात आणि त्या देशातील भाषा तुम्हाला येत नसेल तर अशावेळी तुम्ही ट्रांसलेशनचा वापर करू शकता. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही इतर भाषांमध्ये लिहिलेले साइन बोर्ड, मेनू आणि इतर कागदपत्रे सहजपणे ट्रांसलेट करू शकता आणि त्यामध्ये काय लिहीले आहे समजू शकतात.
जर तुम्हाला एखाद्या वस्तूची ओळख पटवायची असेल किंवा इंटरनेटवर त्या वस्तूबाबत सर्च करायचं असेल तर तुम्ही गूगल लेंस सर्चचा वापर करू शकता. तुम्हाला गूगल लेंस ओपन करून त्या वस्तूचा फोटो क्लिक करायचा आहे. त्यानंतर त्या वस्तूबाबत इंटरनेटनवर उपलब्ध असलेली सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. हे केवळ त्या वस्तूबद्दल माहितीच देणार नाही, तर ती वस्तू उपलब्ध असल्यास ती खरेदी करण्याची लिंक देखील दाखवेल.
Year Ender 2025: Gemini AI मुळे वर्षाचा शेवट होणार आणखी खास, सोशल मीडियावर अपलोड करा तुमचे खास फोटो
डॉक्यूमेंट स्कॅनिंग सध्या अनेकांची गरज बनले आहे. तुम्ही स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या मदतीने अगदी सहज कोणतेही डॉक्युमेंट स्कॅन करू शकता. यापूर्वी डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी मोठ्या स्कॅनरची आवश्यकता असायची. मात्र आता असं नाही. आता तुम्ही स्मार्टफोन कॅमेऱ्याच्या मदतीने अगदी सहज डॉक्युमेंट स्कॅन करू शकता. तसेच तुम्ही विविध अॅप्स वापरून ते डॉक्युमेंट एडिट देखील करू शकता.