Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-मेल आयडी प्रोफेशनल नाही? चिंता नको! आता क्षणातच बदलू शकता तुमचे यूजरनेम, फक्त फॉलो करा या स्टेप्स

गूगलच्या नवीन फीचरमुळे यूजर्सना जिमेल अकाऊंटचे यूजरनेम बदलण्याची सुविधा मिळणार आहे. सध्या गूगलचे हे फीचर केवळ अमेरिकेतील यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 01, 2026 | 02:41 PM
ई-मेल आयडी प्रोफेशनल नाही? चिंता नको! आता क्षणातच बदलू शकता तुमचे यूजरनेम, फक्त फॉलो करा या स्टेप्स

ई-मेल आयडी प्रोफेशनल नाही? चिंता नको! आता क्षणातच बदलू शकता तुमचे यूजरनेम, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • जिमेलमध्ये आता @gmail.com आधीचे यूजरनेम बदलण्याची सुविधा मिळणार असून नवीन अकाऊंट तयार करण्याची गरज राहणार नाही
  • यूजरनेम बदलल्यानंतरही फोटो आणि फाइल्स आणि जुने ईमेलपूर्णपणे सुरक्षित राहतील
  • गूगलचे username बदलण्यासाठी 12 महिन्यांची मर्यादा ठेवली असून जुना ईमेल म्हणून सुरू राहणार आहे
गूगलचे जिमेल जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे ऑनलाईन अकाऊंट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकं गुगलच्या जिमेल सुविधेचा वापर करत आहेत. अनेक लोकांनी बऱ्याच वर्षापूर्वी त्यांचे एक जिमेल अकाऊंट ओपन केले होते. आजही अनेक लोकं त्यांच्या त्याच जुन्या जिमेल अकाऊंटचा वापर करत आहेत. पण अनेकांची अशी इच्छा आहे की, त्यांना त्यांच्या जिमेल अकाऊंटचे नाव बदलायचे आहे. अशाच यूजर्ससाठी आता आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. आता यूजर्स त्यांच्या जिमेल अकाऊंटचे यूजरनेम बदलू शकणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, आता यूजर्सना @gmail.com आधी वापरले जाणारे नाव बदलण्याची सुविधा मिळणार आहे.

Airtel Recharge Plan: कमी पैशांत जास्त सुविधा! कंपनी घेऊन आली स्वस्त प्लॅन, JioHotstar सब्सक्रिप्शनसह मिळणार इतका डेटा

डेटा राहणार सुरक्षित

यापूर्वी जेव्हा यूजर्सना त्यांच्या अकाऊंटचे नाव बदलायचे असेल तेव्हा त्यांच्याकडे केवळ एकच पर्याय होता, तो म्हणजे नवीन अकाऊंट तयार करणं. मात्र आता असं होणार नाही. कारण गूगलच्या नवीन फीचरमुळे यूजर्सना जिमेल अकाऊंटचे यूजरनेम बदलण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे आता यूजर्सना केवळ यूजरनेमसाठी नवीन अकाऊंट तयार करण्याची गरज भासणार नाही. जीमेल यूजरनेम बदलल्यानंतर देखील तुमचे ईमेल, फोटो आणि फाइल्स सर्वकाही पूर्वीसारखेच राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. गुगलने ही सुविधा दिली आहे कारण तुमचा नवीन ईमेल तुमचा मुख्य लॉगिन आयडी बनेल. (फोटो सौजन्य – Pinterest)

You asked, we delivered. If you’re a U.S. Google user, you can now change your account username for tools like Gmail, Photos, Drive and more — while keeping your emails, data and account history. Here’s what to know: 1️⃣ You can choose any available @gmail.com username. 2️⃣… pic.twitter.com/eF2lgbJaFg — Google (@Google) March 31, 2026

जीमेल यूजरनेम बदलण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

सर्वात आधी तुम्हाला गुगल अकाऊंटच्या सेटिंगमध्ये जावे लागणार आहे. इथे पर्सनल इंफॉरमेशन ओपन करा आणि ईमेलवर टॅप करा. नवीन गूगल अकाऊंट ईमेल निवडा आणि हा ईमेल बदलण्याचा पर्याय निवडा. तुमचे नवीन यूजरनेम निवडा किंवा तयार करा आणि त्याची पुष्टी करा. सध्या गूगलचे हे फीचर केवळ अमेरिकेतील यूजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनी टप्प्याटप्प्याने हे फीचर सर्व यूजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

तुमच्या जुन्या ईमेल आयडीचे काय होणार?

गुगलने सांगितलं आहे की, नवीन फीचरअंतर्गत जेव्हा एखादा यूजर त्यांचा ईमेल बदलतो, तेव्हा त्या यूजरचा जुना जीमेल आईडी एक ऑप्शनल ईमेल एड्रेस स्वरुपात काम सुरु ठेवतो. जर कोणी तुमच्या जुन्या ईमेल आयडीवर ईमेल पाठवला तर तो ईमेल तुम्हाला तुमच्या नवीन ईमेल आयडीवर मिळणार आहे. जिमेल यूजरनेम बदलण्यासाठी काही मर्यादा सेट करण्यात आल्या आहेत.

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीसाठी Google Gemini वर तयार करा खास AI फोटो; सोशल मीडियावर व्हायरल झाले हे प्रॉम्प्ट्स

  • यूजर्स वारंवार त्यांचा ईमेल आयडी बदलू शकत नाही.
  • एकदा यूजरनेम बदलल्यानंतर सुमारे 12 महिन्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत यूजर्स पुन्हा त्यांचा ईमेल आयडी बदलू शकणार नाहीत.
  • तुम्हाला हवे असलेले नवीन यूजरनेम उपलब्ध असले पाहिजे.
  • तुमचे जुने यूजरनेम कोणत्याही दुसऱ्या व्यक्तिला दिले जाणार नाही.
  • उदाहरणार्थ, जर तुम्हाला तुमचे जुने युझरनेम एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला द्यायचे असेल, तर हे शक्य होणार नाही.

Web Title: Now gmail users can change their username follow this process step by step tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • gmail
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.