Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! WhatsApp वर आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठीही करता येणार अर्ज, ‘या’ शहरात सुरू होणार सेवा

आता ड्रायव्हिंग लायसन्स किंवा विवाह प्रमाणपत्रासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. 'व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स' ही अनोखी सेवा सुरू करत आहे, ज्यामुळे सर्व सरकारी कामे घरबसल्या करता येणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 29, 2025 | 05:15 PM
काय सांगता! WhatsApp वर आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठीही करता येणार अर्ज, ‘या’ शहरात सुरू होणार सेवा
Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट बनवायचे असेल, तर आता सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज राहणार नाही. दिल्ली सरकार एका नवीन उपक्रमावर काम करत आहे, ज्यामुळे ही सर्व कामे तुम्ही घरबसल्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) च्या माध्यमातून करू शकणार आहात. या अनोख्या उपक्रमाला ‘व्हॉट्सअॅप गव्हर्नन्स’ (WhatsApp Governance) असे नाव देण्यात आले आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांना सरकारी कामांसाठी लांब रांगेत उभे राहण्याची किंवा कार्यालयाच्या चकरा मारण्याची आवश्यकता राहणार नाही.

व्हॉट्सअॅपवर कोणती कागदपत्रे बनवता येतील?

या नवीन उपक्रमांतर्गत विवाह प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांसारख्या अनेक सरकारी सेवांचा समावेश केला जाईल. लोक व्हॉट्सअॅपद्वारेच या कागदपत्रांसाठी अर्ज करू शकतील, त्यांचे अर्ज व्हेरिफाय करू शकतील आणि कागदपत्रे डाऊनलोडदेखील करू शकतील. यामुळे संपूर्ण प्रक्रिया जलद होईल आणि सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या कमी होतील. तसेच, यामुळे भ्रष्टाचार कमी होण्याचीही आशा आहे.

हे देखील वाचा: Apple – Samsung ला फोडणार घाम 15,000mAH ‘जंबो’ बॅटरीवाला फोन, आता चार्जिंगचाही नाही त्रास

ही सेवा कशी काम करेल?

WhatsApp Governance प्लॅटफॉर्मवर AI-पावर्ड चॅटबॉट असेल. हा चॅटबॉट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये काम करेल. तो युजर्सना मदत करण्यासोबतच संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित (ऑटोमॅटिक) करेल आणि सर्व सरकारी विभागांशी संबंधित माहितीही देईल. सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर २५ ते ३० सेवांचा समावेश केला जाईल आणि हळूहळू इतर विभागदेखील जोडले जातील. चांगल्या समन्वयासाठी, या प्लॅटफॉर्मला दिल्लीच्या ई-डिस्टिंक्ट पोर्टलशी जोडले जाईल.

या सेवेचा वापर कसा करायचा?

सध्या या प्लॅटफॉर्मवर काम सुरू आहे आणि ते कधी लाँच होईल याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. एकदा हे लाँच झाल्यानंतर, युजर्सला चॅटबॉटला फक्त ‘Hi’ असा मेसेज पाठवून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. चॅटबॉट युजर्सला एक फॉर्म देईल. हा फॉर्म भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अपलोड करायची आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी असणार आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल.

Web Title: Now you can apply for a driving license on whatsapp the service will be launched in this city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • driving license
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Apple – Samsung ला फोडणार घाम 15,000mAH ‘जंबो’ बॅटरीवाला फोन, आता चार्जिंगचाही नाही त्रास
1

Apple – Samsung ला फोडणार घाम 15,000mAH ‘जंबो’ बॅटरीवाला फोन, आता चार्जिंगचाही नाही त्रास

एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स, वाचा यादी
2

एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स, वाचा यादी

Realme 828 Fan Festival: संपता संपणार नाही बॅटरी, Realme ने सादर केला नवीन कॉन्सेप्ट फोन; बॅक-टू-बॅक पहा 25 चित्रपट
3

Realme 828 Fan Festival: संपता संपणार नाही बॅटरी, Realme ने सादर केला नवीन कॉन्सेप्ट फोन; बॅक-टू-बॅक पहा 25 चित्रपट

iPhone 17 Air की iPhone 17 Slim? कोणत्या नावाने लाँच केला जाणार Apple चा सर्वात पातळ iPhone?
4

iPhone 17 Air की iPhone 17 Slim? कोणत्या नावाने लाँच केला जाणार Apple चा सर्वात पातळ iPhone?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.