Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! आता YouTube वर जाहिरातींचा त्रास संपणार, असा आहे 200 रुपयांचा ओटीटी टॉप-अप प्लॅन

Airtel YouTube Premium: एअरटेलने यूट्यूबसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. आता कंपनीच्या 200 रुपयांच्या ओटीटी टॉप-अप पॅकमध्ये युट्यूब प्रिमियमचा देखील समावेश केला जाणार आहे. शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 24, 2026 | 10:55 AM
Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! आता YouTube वर जाहिरातींचा त्रास संपणार, असा आहे 200 रुपयांचा ओटीटी टॉप-अप प्लॅन

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! आता YouTube वर जाहिरातींचा त्रास संपणार, असा आहे 200 रुपयांचा ओटीटी टॉप-अप प्लॅन

Follow Us
Follow Us:
  • एअरटेलने केली यूट्यूबसोबत भागीदारीची घोषणा
  • सध्याच्या प्रीपेड एंटरटेनमेंट पोर्टफोलियोमध्ये युट्यूब प्रिमियमचा समावेश
  • एअरटेलच्या 200 रुपयांच्या ओटीटी टॉप-अपद्वारे युट्यूब प्रिमियमचा फायदा
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Airtel ने शुक्रवारी भारतातील त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ग्राहकांना युट्यूब प्रिमियमचे फायदे ऑफर करण्यासाठी कंपनीने युट्यूबसोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. एका परवडणाऱ्या एंटरटेनमेंट टॉप-अपद्वारे ही ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे. कारण सध्याच्या काळात मोबाईल डेटाचा वापर केवळ कॉलिंगसाठी किंवा मेसेजिंगसाठी केला जात नसून विविध कार्यक्रम, चित्रपट पाहणे, कंटेंट क्रिएटर्सना फॉलो करणे, संगीत ऐकण्यासाठी देखील केला जातो. ग्राहकांमधील मोबाईल डेटाचा हा बदलता वापर लक्षात घेत एअरटेलने ही घोषणा केली आहे.

Vivo Y600 ने रचला इतिहास! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सलग 32 तास 37 मिनिटे सुरू राहिला स्मार्टफोन

एअरटेलची यूट्यूबसोबत भागीदारी

एअरटेलने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्स यूट्यूब शॉर्ट्ससह जाहिरातमुक्त यूट्यूबचा आनंद घेऊ शकणार आहेत. तसेच, यूजर्सना बॅकग्राऊंड प्ले, ऑफलाइन डाऊनलोड आणि यूट्यूब म्युझिक प्रीमियमचा देखील लाभ मिळणार आहे. आता एअरटेल ग्राहक कार्यक्रम, चित्रपटांचे स्ट्रीमिंग, कंटेंट क्रिएटर्सचे व्हिडिओ, संगीत अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहू शकणार आहेत.

प्रीपेड एंटरटेनमेंट पोर्टफोलियोमध्ये युट्यूब प्रिमियमचा समावेश

जारी करण्यात आलेल्या एका प्रेस नोटमध्ये एअरटेलने सांगितलं आहे की, त्यांच्या सध्याच्या प्रीपेड एंटरटेनमेंट पोर्टफोलियोमध्ये युट्यूब प्रिमियमचा समावेश केला जात आहे. टेलीकॉम सर्विस प्रोवाइडरचं असं म्हणणं आहे की, जे ग्राहक व्हिडीओ पाहणे, क्रिएटर्सना फॉलो करणं, गाणी ऐकणं आणि नवीन कंटेंट डिस्कवर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा खर्च करतात, अशा ग्राहकांसाठी कंपनीचा हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

ओटीटी टॉप-अपद्वारे मिळणार युट्यूब प्रिमियमचा लाभ

ग्राहक एअरटेलच्या 200 रुपयांच्या ओटीटी टॉप-अपद्वारे युट्यूब प्रिमियमचा फायदा घेऊ शकतात. या टॉप-अपमध्ये यूजर्सना 30GB एडिशनल डेटा आणि दूसऱ्या एंटरटेनमेंट सर्विसचा ॲक्सेस मिळणार आहे. एअरटेलच्या सध्याच्या श्रेणीमध्ये आधीच प्राइम व्हिडिओ, जिओ-हॉटस्टार, झी5 प्रीमियम आणि सोनीलिव्ह यांसारख्या सेवांसह इतर 18 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात…

एअरटेल ॲपद्वारे युट्यूब प्रिमियम क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • एअरटेल प्रीपेड यूजर्स 200 रुपयांचे टॉप-अप खरेदी केल्यानंतर काही सोप्या स्टेप्स फॉलो करून युट्यूब प्रिमियम क्लेम करू शकणार आहेत.
  • सर्वात आधी तुमचा एलिजिबल एयरटेल प्रीपेड नंबर रिचार्ज केलेला असणं गरजेचं आहे, ज्यामुळे कनेक्शन ॲक्टिव राहू शकते.
  • यानंतर 200 रुपयांचे ओटीटी टॉप-अप खरेदी करा, ज्यामध्ये 30GB एडिशनल डेटा समाविष्ट आहे.
  • आता तुमच्या स्मार्टफोनमध्ये एअरटेल ॲप ओपन करा आणि रिवॉर्ड्स अँड ओटीटी सेक्शनमध्ये जा.
  • इथे दिसणाऱ्या युट्युब प्रिमियम बेनिफिटवर क्लिक करा आणि स्क्रीनवर दिलेल्या सूचना फॉलो करून युट्युब प्रिमियम फायदे क्लेम करा.
💡

Frequently Asked Questions

  • Que: एअरटेलने YouTube सोबत कोणती भागीदारी केली आहे?

    Ans: एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांना YouTube Premium चे फायदे देण्यासाठी YouTube सोबत भागीदारी केली आहे.

  • Que: एअरटेलच्या YouTube Premium ऑफरसाठी किती रुपये खर्च करावे लागतील?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, एअरटेलच्या २०० रुपयांच्या OTT टॉप-अपद्वारे YouTube Premium चा लाभ घेता येणार आहे.

  • Que: एअरटेलच्या २०० रुपयांच्या टॉप-अपमध्ये किती डेटा मिळेल?

    Ans: या टॉप-अपमध्ये ३०GB अतिरिक्त डेटा आणि मनोरंजन सेवांचा ॲक्सेस मिळणार आहे.

Web Title: Airtel offers youtube premium with 200 rupees ott top up includes 30gb additional data hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Vivo Y600 ने रचला इतिहास! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सलग 32 तास 37 मिनिटे सुरू राहिला स्मार्टफोन
1

Vivo Y600 ने रचला इतिहास! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सलग 32 तास 37 मिनिटे सुरू राहिला स्मार्टफोन

1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर
2

1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: सावधान! ऑनलाईन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स…
3

Tech Tips: सावधान! ऑनलाईन सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स…

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय
4

जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.