
12,070mAh बॅटरी अन् गेमिंगसाठी खास फीचर्स! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष... जाणून घ्या डिटेल्स
पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स… नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी
स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 4,199 युआन म्हणजेच सुमारे 49,000 रुपये, 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 4,599 युआन म्हणजेच सुमारे 53,700 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 4,899 युआन म्हणजेच सुमारे 57,200 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 5,199 युआन म्हणजेच सुमारे 60,700 रुपये आहे. (फोटो सौजन्य: X)
स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 3,199 युआन म्हणजेच सुमारे 37,300 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 3,499 युआन म्हणजेच सुमारे 40,800 रुपये, 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 3,899 युआन म्हणजेच सुमारे 45,500 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 4,199 युआन म्हणजेच सुमारे 49,000 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 4,499 युआन म्हणजेच सुमारे 52,500 रुपये आहे.
स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर मिळणार आहे. तसेच, या डिव्हाईसमध्ये एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेज मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 2K रेजोल्यूशन आणि 185Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये Honor ची इन-हाउस WIN डिस्प्ले चिप, डुअल Demura कॅलिब्रेशन आणि 5920Hz PWM डिमिंग टेक्नोलॉजी देखील मिळणार आहे. गेंमिगदरम्यान डिव्हाईस थंड राहण्यासाठी यामध्ये Dongfeng Turbo कूलिंग सिस्टिम मिळणार आहे.
गेमिंगसाठी फोनमध्ये 5000Hz इंस्टेंट टच सँपलिंग रेट, 520Hz टेन-फिंगर टच सँपलिंग आणि 800Hz जायरोस्कोप मिळणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, फोनमध्ये टॅप लेटेंसी 21 मिलीसेकंदपर्यंत आहे. डिव्हाईसमध्ये ऑडिओसाठी डुअल 1216 स्पीकर आणि मॅट मेटल फ्रेम आहे. फोनच्या WIN एनर्जी रिंगमध्ये 40 से ज्यादा लाइटिंग इफेक्ट्स देखील मिळणार आहे. यामध्ये IP68, IP69 आणि IP69K रेटिंग देखील आहे.
फोटोग्राफीसाठी ऑनर विन आरटी 2 मध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. ज्यामध्ये 1/1.55-इंच सेंसर आणि OIS सपोर्ट मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि सेल्फीसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.
ऑनर विन टर्बो 2 मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये ॲक्टिव कूलिंग फॅन दिला नाही. मात्र हा स्मार्टफोन देखील 12,070mAh बॅटरी आणि 2K रेजोल्यूशनवाल्या 185Hz डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 6.89 इंच फ्लॅट एलटीपीएस ओएलईडी डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये WIN डिस्प्ले आणि WIN टच चिप्ससह 10,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.
फोनमध्ये 5920Hz PWM डिमिंग सपोर्ट देखील मिळणार आहे. गेमिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000Hz टच सँपलिंग, 520Hz टेन-फिंगर टच रिपोर्टिंग आणि 800Hz जायरोस्कोप मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर आणि डुअल 1216 सिमेट्रिकल स्पीकर आहे.
फोनमध्ये एआय एनेमी फूटस्टेप एनहांसमेंट फीचर गेमिंगदरम्यान यूजर्सना मदत करू शकतो. स्मार्टफोनची बॅटरी 90W वायर्ड चार्जिंग आणि 27W वायर्ड रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. या डिव्हाईसमध्ये बायपास चार्जिंग देखील आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत सांगायचे तर, या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगलाही सपोर्ट मिळतो. याव्यतिरिक्त, हा फोन IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह येतो.
Ans: Honor Win RT 2 आणि Honor Win Turbo 2 हे दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.
Ans: दोन्ही स्मार्टफोनमध्ये १२,०७०mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Ans: Honor Win RT 2 ची सुरुवातीची किंमत ४,१९९ युआन (अंदाजे ₹४९,०००) आहे. Honor Win Turbo 2 ची सुरुवातीची किंमत ३,१९९ युआन (अंदाजे ₹३७,३००) आहे.