
पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स... नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी
कूलपॅड कूल एक्स वाईड हा स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या तीन व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 999 युआन म्हणजेच सुमारे 8,700 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 1,199 युआन म्हणजेच सुमारे 10,500 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 1,399 युआन म्हणजेच सुमारे 12,200 रुपये आहे. ग्राहक JD.com द्वारे स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर करू शकतात. हा स्मार्टफोन भारत आणि दुसऱ्या देशांमध्ये कधी लाँच होणार, याची माहिती अद्याप शेअर करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य: X)
कूलपॅड कूल एक्स वाईडमध्ये 6.38 इंच डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 16:10 आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. फोनचे रुंद डिझाईन व्हिडीओ पाहण्यासाठी, ई-बुक वाचण्यासाठी आणि दुसऱ्या कामांसाठी चांगला अनुभव ऑफर करणार आहे. या स्मार्टफोनची रुंदी सामान्य स्मार्टफोन्सपेक्षा जास्त आहे, तर उंची कमी आहे. याच कारणामुळे याचे डिझाईन मार्केटमध्ये असलेल्या लांब आणि पातळ स्मार्टफोनपेक्षा वेगळे दिसतात. परफॉर्मंससाठी फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G99 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 2.2 स्टोरेज मिळणार आहे.
डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये TF कार्डच्या मदतीने स्टोरेज 256GB पर्यंत वाढवण्याचा पर्याय मिळणार आहे. फोनमध्ये वापरलेले Helio G99 प्रोसेसर केवळ 4G नेटवर्कला सपोर्ट करतो. याचा अर्थ असा आहे की, स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिविटी नाही.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP चा कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच, फोनमध्ये 4,600mAh बॅटरी मिळणार आहे. कंपनीने सध्या चार्जिंग स्पीड आणि फ्रंट कॅमेऱ्याचे डिटेल्स शेअर केले नाहीत. कूलपॅडने त्यांच्या कूल एक्स वाईडला एका नव्या फॉर्म फॅक्टरवाला स्मार्टफोन म्हणून लाँच केला आहे. यापूर्वी, हुवावेने ‘पुरा एक्स व्ह्यू’ नावाचा एक वाइड-स्क्रीन स्मार्टफोनही सादर केला होता.
Ans: या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची पासपोर्टसारखी रुंद डिझाइन आणि 6.38 इंचांचा डिस्प्ले आहे.
Ans: या स्मार्टफोनची चीनमधील सुरुवातीची किंमत 999 युआन म्हणजेच अंदाजे 8,700 रुपये आहे.
Ans: या फोनमध्ये 6.38 इंचांचा डिस्प्ले, 16:10 आस्पेक्ट रेशियो आणि 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट मिळतो.