हातांची गरज नाही, आता डोळ्यांच्या इशाऱ्यावर काम करेल तुमचा iPhone! जबरदस्त आहे हे फीचर
तुम्ही आतापर्यंत तुमचा आयफोन तुमच्या हातांनी ऑपरेट करत होतात. पण जर आता आम्ही तुम्हाला सांगितो की तुम्हाला तुमचा आयफोन ऑपरेट करण्यासाठी हातांची गरज नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर तुमचा आयफोन ऑपरेट करू शकता. होय, जर तुम्हाला तुमच्या आयफोनला टच करण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही डोळ्यांच्या इशाऱ्यावर अगदी सहज तुमचा आयफोन कंट्रोल करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये काही सोपी सेटिंग करावी लागणार आहे.
तयार आहात ना! या आठवड्यात ओपन होणार Apple चा मॅजिक बॉक्स, iPhone SE 4 सह लाँच होणार हे गॅझेट्स
जर तुम्हाला बोटांनी आयफोन वापरण्याचा कंटाळा आला असेल, तर iOS 18 अपडेट वापरकर्त्यांना फक्त डोळ्यांच्या हावभावांनी डिव्हाइस नियंत्रित करण्याची परवानगी देतो. हे आय ट्रॅकिंग फीचरद्वारे करता येते. ही सेटिंग सक्षम केल्यानंतर, आयफोन चालवण्यासाठी बोटांची गरज नाहीशी होते. फक्त तुमच्या डोळ्यांचा वापर करून आयफोनवर कामं करता येतात. हे वैशिष्ट्य सक्षम करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. चला तर मग ही सेटिंग कशी चालू करता येईल, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
आय ट्रॅकिंग फीचर आयफोनवरील बिल्ट-इन फ्रंट-फेसिंग कॅमेरा वापरते. चांगल्या परिणामांसाठी, कॅमेरा स्वच्छ आहे आणि योग्य प्रकाशात आहे याची खात्री करा. यासाठी, आयफोन तुमच्या चेहऱ्यापासून सुमारे दीड फूट अंतरावर स्थिर असावा. हे वैशिष्ट्य आयफोन 12 आणि त्यानंतरच्या सर्व आयफोनना सपोर्ट करते. हे आयफोन एसई (3rd Gen) साठी देखील उपलब्ध आहे. कंपनीने ते iOS 18 अपडेटसह वापरकर्त्यांसाठी सादर केले.
आय ट्रॅकिंग कॅलिब्रेट करण्यासाठी ऑनस्क्रीन सूचनांचे अनुसरण करा. स्क्रीनभोवती वेगवेगळ्या ठिकाणी एक बिंदू दिसताच, तुमच्या डोळ्यांनी त्यानुसार त्याच्या हालचाली ट्रॅक करा. तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या सहाय्यांनी तुमचा आयफोन ऑपरेट करायचा असेल तर ऑनस्क्रीन पॉइंटर लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आय ट्रॅकिंग फीचर चालू करता तेव्हा तुम्हाला आय ट्रॅकिंग कॅलिब्रेट करावे लागेल.
एकदा तुम्ही आय ट्रॅकिंग चालू केले आणि कॅलिब्रेट केले की, ऑनस्क्रीन पॉइंटर तुमच्या डोळ्यांच्या हालचाली ट्रॅक करतो. जेव्हा तुम्ही स्क्रीनवर एखादी वस्तू पाहता तेव्हा त्या वस्तूभोवती एक फ्रेमवर्क दिसते. जेव्हा तुम्ही स्क्रीनवरील एखाद्या जागेवर तुमची नजर स्थिर करता तेव्हा तुम्ही जिथे पाहत आहात तिथेच ड्वेल पॉइंटर दिसतो. या काळात टायमर सुरू होतो आणि क्रिया डीफॉल्टनुसार परफॉर्म करू लागते. हे वैशिष्ट्य विशेषतः अॅपलने अपंग आणि शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी सादर केले आहे.