Nothing Phone 2a स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 'ही' कंपनी देतेय जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंट
तुम्ही नवीन आणि बजेट फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या अनेक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जेव्हा स्मार्टफोन खरेदी करायला जातो, तेव्हा सहसा गोंधळात पडतो. कारण एवढ्या मोठ्या स्मार्टफोनच्या ढिगाऱ्यातून आपल्यासाठी बेस्ट स्मार्टफोन शोधणं थोडं कठीण आहे. तुम्ही देखील तुमच्या नवीन स्मार्टफोनच्या निवडीबद्दल गोंधळला असाल, कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा हे तुम्हाला समजत नसेल तर ही बातमी वाचा.
या कारणामुळे Smartphone होतो ओव्हरहीट? तुम्हीही ही चूक तर करत नाही
आम्ही तुम्हाला अशा फोनबद्दल सांगणार आहोत जो फ्लिपकार्टच्या ऑफर्ससह खरेदी करता येईल. खरं तर आता आम्ही तुम्हाला बेस्ट बजेट फ्रेंडली स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. या स्मार्टफोनमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे तुमची रोजची कामं अगदी चुटकीसरशी केली जाऊ शकतात. खरं तर आम्ही Nothing Phone 2a बद्दल बोलत आहोत. फ्लिपकार्टवर Nothing Phone 2a आकर्षक डिस्काऊंट आणि उत्कृष्ट डिल्ससह कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्लिपकार्टवर Nothing Phone 2a च्या खरेदीवर खूप मोठी ऑफर दिली जात आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. त्यावर कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
Nothing Phone 2a सध्या फ्लिपकार्टवर 21,999 रुपयांच्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही SBI किंवा HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळवू शकता. अधिक बचत करण्यासाठी त्यावर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. जर जुन्या फोनची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला चांगली किंमत मिळेल. ज्यामुळे Nothing Phone 2a ची प्रभावी किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल. त्यामुळे तुम्हाला या स्मार्टफोनच्या खरेदीवर चांगलाच फायदा होणार आहे.
Nothing Phone 2a मध्ये 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे जो HDR10+ ला सपोर्ट करतो. यात 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. याला 1,300 निट्सची कमाल ब्राइटनेस मिळते. सुरक्षिततेसाठी, त्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण मिळाले आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 प्रो चिपसेटमुळे Nothing Phone 2a चांगली कामगिरी करतो.
चिपसेट 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह जोडलेला आहे. याला पॉवर देण्यासाठी, त्यात 5,000 mAh बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी, Nothing Phone 2a स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी शूटर आणि 50MP चा अल्ट्रावाइड सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
चॅटजीबीटीचे गुगलला आव्हान! आता ChatGPT Search वापरण्यासाठी युजर्सना लॉगिन करावे लागणार नाही
आजकाल कंपनी Nothing Phone 3a लाँच करण्याची तयारी करत आहे. त्याची लाँच तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे आणि या स्मार्टफोनचा टीझर देखील दजारी करण्यात आला आहे. हा फोन 4 मार्च रोजी भारतात लाँच होईल.