तयार आहात ना! या आठवड्यात ओपन होणार Apple चा मॅजिक बॉक्स, iPhone SE 4 सह लाँच होणार हे गॅझेट्स
अॅपल प्रोडक्ट्सचे शौकीन असलेल्या प्रत्येक व्यक्तिसाठी हा आठवडा अत्यंत खास असणार आहे. कारण कंपनी या वर्षातील पहिले लाँचिंग करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला iPhone SE 4 आता आखेर सत्यात उतरणार आहे. म्हणजेच या आठवड्यात iPhone SE 4 लाँच केला जाणार आहे. केवळ iPhone SE 4 च नाही तर त्याच्यासोबत इतरही अनेक प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत, ज्याची अॅपल युजर्सना दिर्घ काळापासून प्रतिक्षा होती. चला तर मग कंपनी या आठवड्यात कोणते प्रोडक्ट्स लाँच करणार आहे आणि त्यांची किंमत व स्पेसिफिकेशन्स काय असतील यावर एक नजर टाकूया.
या आठवड्यात सर्वांच्या नजरा iPhone SE 4 च्या लाँचिंगवर आहेत. हे 2022 मध्ये लाँच झालेल्या iPhone SE 3 ची जागा घेईल. याला iPhone 16E असेही म्हटले जात आहे आणि त्याच्या डिझाइनमध्ये अनेक बदल दिसून येतील. गेल्या अनेक महिन्यांपासून या आयफोनची चर्चा सुरु आहे. नवीन आयफोन्समध्ये फेस आयडी आणि यूएसबी-सी पोर्ट असल्याची पुष्टी झाली आहे. त्याचा लूक iPhone 14 सारखा असू शकतो आणि तो 6.06 ओएलईडी डिस्प्लेने सुसज्ज असेल. असे सांगितले जात आहे की Apple या आगामी आयफोनमध्ये A18 चिपसेट देऊ शकते, जो 8GB रॅमसह जोडला जाईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
या आयफोनमध्ये स्टोरेज 128 जीबी असण्याची अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आयफोन परवडणाऱ्या किंमतीत लाँच केला जाणार आहे. त्यामुळे हा कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन असणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, आयफोन आणि इतर प्रोडक्ट्सच्या लाँचिंगसाठी कंपनी कोणताही कार्यक्रम आयोजित करणार नाही. त्याऐवजी, फक्त एका प्रेस रिलीज व्हिडिओद्वारेच आगामी आयफोन आणि इतर प्रोडक्ट्स लाँचिंग होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या वर्षातील कंपनीचं हे पहिलं लाँचिंग असणार आहे.
मार्क गुरमनचा दावा आहे की 2024 मध्ये ज्या पद्धतीने M4 मॅकची घोषणा करण्यात आली होती त्याच पद्धतीने iPhone SE 4 लाँच केले जाईल. लाँचमध्ये प्रत्येक मॅकसाठी 10 मिनिटांचा व्हिडिओ समाविष्ट होता. कंपनी iPhone SE 4 साठी देखील हीच पद्धत अवलंबू शकते. iPhone SE 4 मध्ये अधिक आधुनिक डिझाइन, रिप्लेसमेंट होम बटण, पहिल्यांदाच फेस आयडी आणि A18 चिपसेट यांचा समावेश आहे. अॅपल इंटेलिजेंसला सपोर्ट करणारा हा सर्वात स्वस्त आयफोन असेल. त्यात नवीनतम iOS 18 प्री-इंस्टॉल केलेले असेल. फोटोग्राफीसाठी यात मागील बाजूस 48 एमपी सेन्सर असेल आणि तो यूएसबी-सी चार्जिंगला सपोर्ट करेल. अफवांनुसार, लाँचिंगची तारीख 11 फेब्रुवारी असू शकते.
Apple या आठवड्यात Powerbeats Pro 2 देखील लाँच करू शकते. ते पहिल्यांदा 2019 मध्ये लाँच करण्यात आले होते आणि तेव्हापासून ते फिटनेस उत्साही लोकांचे आवडते प्रोडक्ट बनले आहेत. आता हे चांगल्या ध्वनी गुणवत्तेसह आणि मोठ्या बॅटरीसह अपग्रेड केले जाऊ शकतात. या प्रोडक्ट्सच्या लाँचची माहिती प्रेस रिलीजद्वारे दिली जाईल.
iPhone SE 4 सोबत, कंपनी आयपॅड लाइनअप देखील अपडेट करू शकते अशी अफवा आहे. असे मानले जाते की कंपनी एक नवीन एंट्री-लेव्हल आयपॅड लाँच करू शकते किंवा आयपॅड एअर अपग्रेड करू शकते. यासोबतच, मॅकबुक एअरलाही अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की नवीन मॅकबुक एअर M4 चिप्ससह लाँच केला जाऊ शकतो. जर असे झाले, तर मॅकमध्ये कंपनीची नेक्स्ट-जनरेशन चिप असण्याची ही पहिलीच वेळ असेल.