GLASES (फोटो सौजन्य PINTERST)
Apple लवकरच एक स्मार्ट चष्मा सादर करू शकते. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी सांगितलं आहे की अॅपल स्मार्टग्लास प्रकल्प, ज्याचे कोडनेम N50 आहे, तो अजूनही विकासाच्या टप्प्यात आहे. कंपनी या स्मार्ट चष्म्यांना खऱ्या अर्थाने Apple इंटेलिजेंस डिव्हाइस बनवू शकते. यासोबतच कंपनी कॅमेरासह नवीन AirPods देखील सादर करणार आहेत. चला जाणून घेऊयात या स्मार्ट चष्म्याच्या बाबतीत आणि AirPods च्या बाबतीत.
Foldable iPhone आणि २० वी एनिवर्सरी एडिशन आयफोनचा उत्पादन कुठे? भारत की चीन?
Apple चा आगामी iPhone 17 सिरीज खूप चर्चेत आहे. कारण यावेळी कंपनी या मालिकेतील उपकरणांची रचना बदलू शकते. दरम्यान, असे रेपोस्ट देखील समोर येत आहे ज्यात असे म्हंटले जात आहे की Apple काही काळापासून स्मार्ट चष्म्यावर काम करत आहे. या स्मार्ट चष्म्यांमध्ये कॅमेरा आणि मायक्रोफोन पाहता येईल असे म्हंटले जात आहे.
याशिवाय, कंपनी लवकरच असे एयर्पोड्स देखील सादर करू शकते ज्यामध्ये इन्फ्रारेड कॅमेरे आढळू शकतात. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी रिपोर्टदिला आहे की अॅपलचा स्मार्टग्लासेस प्रोजेक्ट, ज्याचे कोड नाव N50 आहे. तो सध्या विकासाच्या टप्प्यात आहे. कंपनी या स्मार्ट चष्म्यांना खऱ्या अर्थाने अॅपल इंटेलिजेंस डिव्हाइस बनवू शकते. कंपनी २०२७ पर्यंत सादर करू शकते.
स्मार्ट ग्लास बनवताना कोणती समस्या
रिपोर्टनुसार हलके आणि कार्यक्षम स्मार्ट चष्मे बनवण्यात अॅपलला अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यात विशेष तंत्रज्ञान आणि डिझाइन्सही संबंधित अनेक आव्हाने समाविष्ट आहेत, परंतु हे चष्मे अनेक विशेष AI वैशिष्ट्यांसह सुसज्ज असू शकतात. याआधीही गुरमन यांनी माहिती दिली होती की या AR ग्लासेसच्या लॉंचिंगला किमान तीन ते पाच वर्षे उशीर लागू शकतो. याचे कारण हार्डवेअर पॉवर, डिस्प्ले क्वालिटी, बॅटरी लाइफ आणि स्लीक डिझाइन असल्याचे म्हंटले जात आहे.
कॅमेरा असलेले नवीन AirPods
कंपनी AirPods सिरीज आणखी स्मार्ट बनवण्याची तयारी करत आहे. अहवालात असे म्हंटले जात आहे की कंपनी असे नवीन AirPods तयार करत आहे ज्यात बाह्यतः दिसणारे इन्फ्रारेड कॅमेरे असू शकतात. खरं तर हे नियमित कॅमेरे नसतील, तर iPhone च्या Face ID मध्ये वापरल्या जाणाऱ्या इन्फ्रारेड सेन्सर असू शकतात.
या इन्फ्रारेड कॅमेर्यांचे काम पर्यावरणीय आणि अवकाशीय देता गोळा करणे आणि तो AI सिस्टमला पाठवणे असेल. या टेकनॉलॉगीच्या मदतीने, AirPods वापरकर्त्यांना आणखी वयक्तिकृत आणि परस्परसंवादी अनुभव मिळेल. यासोबतच, रिपोर्टमध्ये असेही सांगितले जात आहे की या इन्फ्रारेड कॅमेऱ्यांच्या मदतीने AirPods जेश्चर-आधारित नियंत्रणाला देखील सपोर्ट करू शकतात.
50MP च्या कॅमेरासह CMF Phone 2 Pro स्मार्टफोन लाँच; किंमत आणि वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या